अबब! वैद्यकीय कचऱ्याबाबत रुग्णालयाची केवढी हाराकिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 12:03 PM2020-06-20T12:03:22+5:302020-06-20T12:03:37+5:30

म्हणे कचºयाची विल्हेवाट लावतो : कोरोनाच्या काळातही काळजी नाहीच

Abb! What a waste of hospital waste | अबब! वैद्यकीय कचऱ्याबाबत रुग्णालयाची केवढी हाराकिरी

अबब! वैद्यकीय कचऱ्याबाबत रुग्णालयाची केवढी हाराकिरी

Next

जळगाव : जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून कितीही दावे केले जात असले तरी वैद्यकीय कचºयाच्याबाबतीत कोविडच्या पार्श्वभूमीवर अजूनही या रुग्णालयात हाराकिरीच चालत असल्याचे दिसून येत आहे. दि. १५ रोजी वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकण्यात आल्याचे दिसून आले. आता हा वैद्यकीय कचरा ‘कोविड-१९’शी असो वा सर्वसाधारण वैद्यकीय उपचाराशी असो, कोरोनासारखा आजार वाढलेला असताना अशा हाराकिरी दाखवणे योग्य आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
कोरोना हा आजार येण्यापूर्वीपासूनच खरंतर वैद्यकीय कचºयाची कशी विल्हेवाट लावली जावी, याची मार्गदर्शक तत्वे शासनाने आखून दिलेली आहेत. आजपर्यंत त्याची किती अमंलबजावणी झाली, हा संशोधनाचा विषय असला तरी आता एकूणच सर्वच प्रकारच्या वैद्यकीय कचºयाची विल्हेवाट लावणे ‘कोरोना’मुळे अपरिहार्य बनले आहे.
दि. १५ रोजी वैद्यकीय कचरा रुग्णालयाच्या आवारातच टाकण्यात आला होता आणि विशेष म्हणजे हा सर्व कचरा साठवून न ठेवता उघड्यावर टाकण्यात आला होता. या कचºयामध्ये रक्ताचे नमुने जमा करण्यात आलेल्या छोट्या नळ्याही तशाच उघड्यावर टाकून देण्यात आल्या. त्या नळ्यांवर रुग्णाची नावेही आहेत. त्यामुळे कोविड रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुढे आला आहे. याप्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी आता करण्यात येत
आहे.

अशी लावली जाते कचºयाची विल्हेवाट
कोविड-१९मुळे निर्माण झालेल्या वैद्यकीय कचºयाची विल्हेवाट ही विशिष्ट पध्दतीने लावली जाते. सध्या कोविड-१९चा कचरा जमा करण्याचे काम हे मन्साय बायोमेडिकल वेस्ट या कंपनीकडे आहे. या कंपनीकडे ड्युअल चेंबर इन्सिनिरेटर नावाची यंत्रणा आहे. त्यामध्ये हा कचरा टाकला जातो. हा कचरा दोन चेंबरमधून जाताना वेगवेगळ्या तापमानातून जातो. पहिल्या चेंबरमध्ये या कचºयाचा बºयापैकी कार्बन केला जातो. त्यानंतर हा सर्व कचरा दुसºया चेंबरमध्ये पाठवला जातो. काहीप्रमाणात संयुगे जळालेल्या स्थितीत हा कचरा दुसºया चेंबरमध्ये अतिशय जास्त तापमानाखाली ठेवला जातो. ज्याठिकाणी या संपूर्ण कचºयाची राख होते.

कचºयाचे पर्यवेक्षण होते यांच्यासमक्ष
ज्यावेळी कोविड-१९अंतर्गत जमा झालेला कचरा संबंधित वाहनामध्ये ठेवला जातो, त्यावेळी या कचºयाचे वैद्यकीय अधिकारी, सुपरिटेंडंट, आरएमओ, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक व हवालदार यांच्यासमक्ष पर्यवेक्षण केले जाते. पण खरोखरच या कचºयाचे वर्गीकरण होते का? आणि जर असेल तर १५ जूनला जो कचरा उघड्यावर टाकण्यात आला, त्याचं काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

कोविड-१९ कचºयाबाबत काय आहेत मार्गदर्शक सुचना
कोविड-१९मधून निर्माण होणाºया वैद्यकीय कचºयाबाबत केंद्रीय आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत.

-रुग्णालयाच्या प्रत्येक वॉर्डमध्ये विशिष्ट रंगाची पिशवी वा डस्टबिन ठेवावेत. त्यावर कोविड-१९असे लेबल लावण्यात यावे आणि या डस्टबिन वा बॅगचा संपर्क येणार नाही, याची काळजी घ्यावी. त्यासाठी दुहेरी पिशवी वापरावी.

-कोविड-१९चा कचरा हा वेगळ्या बंदीस्त ठिकाणी साठवावा आणि तो परस्पर कचरा संकलन वाहनामध्ये ठेवावा. त्यावर स्पष्ट शब्दात कोविड-१९ असे लिहावे.

-कोविड-१९च्या कचरा संकलनाचा एक वेगळी नोंद ठेवावी आणि ज्याठिकाणी हा कचरा ठेवला जातो ती जागा तसेच कचरा संकलनासाठी वापरलेले वाहन हे वेळोवेळी निर्जंतुक करावे.

Web Title: Abb! What a waste of hospital waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.