आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द केल्याने जामनेरला अभाविपचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:18 AM2021-09-26T04:18:17+5:302021-09-26T04:18:17+5:30
जामनेर : आरोग्य विभागाच्या परीक्षेतील गलथान कारभारामुळे व ढिसाळ नियोजनामुळे अखेर परीक्षा रद्द झाल्याने अभाविपच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी सकाळी पालिका ...
जामनेर : आरोग्य विभागाच्या परीक्षेतील गलथान कारभारामुळे व ढिसाळ नियोजनामुळे अखेर परीक्षा रद्द झाल्याने अभाविपच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी सकाळी पालिका चौकात आंदोलन करून शासनाचा निषेध केला.
शासनाच्या निर्णयाने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. बरेच विद्यार्थी परीक्षेचे केंद्र इतर जिल्ह्यांत आल्यामुळे अडचणीच्या काळातसुद्धा प्रवास खर्च करून पोहोचले असताना ऐनवेळी परीक्षा रद्द करण्यास आरोग्य विभागाचा गलथान कारभार जबाबदार आहे. या प्रकाराच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात आली.
यावेळी शहरमंत्री पवन बावस्कर, कुणाल सपकाळ, यश मोरे, शुभम पाटील, हरेश वाघ, चेतन नेमाडे, लोकेश माहुरे, जय पाटील, विवेक पाटील, सौरव माळी, धनंजय माळी, विवेक पाटील, आकाश घाडगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
250921\25jal_3_25092021_12.jpg
आरोग्य विभागाने परीक्षा रद्द केल्याच्या निषेधार्थ जामनेरला आंदोलन करताना अभाविपचे कार्यकर्ते.