जिल्ह्यातील २१ वस्त्यांमध्ये अभाविपची 'परिषद की पाठशाला'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:12 AM2021-07-04T04:12:37+5:302021-07-04T04:12:37+5:30

जळगाव : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने १ जुलैपासून 'परिषद की पाठशाला' हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्ह्यात ...

Abhavip's 'Parishad Ki Pathshala' in 21 settlements in the district | जिल्ह्यातील २१ वस्त्यांमध्ये अभाविपची 'परिषद की पाठशाला'

जिल्ह्यातील २१ वस्त्यांमध्ये अभाविपची 'परिषद की पाठशाला'

Next

जळगाव : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने १ जुलैपासून 'परिषद की पाठशाला' हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्ह्यात २१ वस्त्यांवर हा उपक्रम राबविला जात आहे.

जिल्ह्यातील ५००पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. हा उपक्रम १५ जुलैपर्यंत राबविला जाणार असून नुकतेच हरिविठ्ठलनगरामध्ये अभाविप पश्चिम क्षेत्रीय संघटनमंत्री देवदत्त जोशी व महाराष्ट्र प्रदेशमंत्री सिद्धेश्वर लटपटे यांच्या हस्ते या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे.

अध्यापनासाठी पुढाकार घ्यावा

कार्यक्रमात हरिविठ्ठलनगर या ठिकाणी सुरू असलेल्या परिषद की पाठशाला या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वह्यावाटप करण्यात आल्या. त्यानंतर देवदत्त जोशी यांनी गरजू विद्यार्थ्यांना उपक्रमात सहभागी करून घेण्याचे आवाहन केले. या उपक्रमासाठी महानगरमंत्री आदेश पाटील, कार्यक्रम प्रमुख रितेश महाजन, आकाश पाटील, संकेत सोनवणे, पवन भोई, भाग्यश्री कोळी, पौर्णिमा देशमुख, चिराग तायडे आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

Web Title: Abhavip's 'Parishad Ki Pathshala' in 21 settlements in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.