माणसाचे आयुष्य बदलण्याची क्षमता संगीतात -डॉ.संतोष बोराडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 03:12 PM2020-08-09T15:12:04+5:302020-08-09T15:13:01+5:30

माणसाचे आयुष्य बदलण्याची क्षमता संगीतात असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध म्युझिक थेरपी डॉ.संतोष बोराडे यांनी केले

The ability to change a person's life in music - Dr. Santosh Borade | माणसाचे आयुष्य बदलण्याची क्षमता संगीतात -डॉ.संतोष बोराडे

माणसाचे आयुष्य बदलण्याची क्षमता संगीतात -डॉ.संतोष बोराडे

googlenewsNext

भुसावळ, जि.जळगाव : संगीताचे नानाविध प्रकार आहेत. बालपणापासून तर मोठे होण्यापर्यंत आपण विविध गीतांमधून संगीताचे ऐकले आह.े आनंद, राग, भावना व्यक्त करण्यासाठी संगीत हे उत्तम माध्यम आहे. मन मोकळे करण्यासाठी संगीताचा वापर केल्यास आपल्यावर आलेला ताणतणाव निश्चितपणे दूर करता येऊ शकतो व माणसाचे आयुष्य बदलण्याची क्षमता संगीतात असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध म्युझिक थेरपी डॉ.संतोष बोराडे यांनी केले

रोटरी क्लब आॅफ ताप्ती व्हॅली भुसावळ आयोजित द्वंद जीवनाचे या व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प आॅनलाइन गुंफण्यात आले. प्रास्ताविक प्रोजेक्ट सेक्रेटरी संजय भटकर यांनी केले.
डॉ. बोराडे पुढे म्हणाले, आपली प्रकृती सुदृढ असताना संगीत ऐकणे गरजेचे आहे. यामुळे आपली प्रबोधन आध्यात्मिक शक्ती वाढते. स्वत:मधील गुण विकसित करता येतात. प्रत्यक्ष तत्त्वज्ञानाची अंमलबजावणी केली पाहिजे. विद्यार्थी चांगला माणूस म्हणून तयार होण्याची क्षमता संगीतामध्ये आहे. संगीत ऐकताना आपण काय ऐकले पाहिजे याचा स्वत:ला प्रश्न विचारला पाहिज.े वाद्य वाजवणे म्हणजे संगीत नाही. आईचे अंगाई गीत, आपण म्हटलेली कविता आपल्याला आवडली हे गाणे पारंपरिक लोकगीते हेसुद्धा संगीतच आहे. आपल्या आयुष्यातील संगीत आपण शोधले पाहिजे. संगीतामधून माणसाला चांगल्या वाईट गोष्टी स्वीकारण्याची शक्ती मिळते. तो घाबरून न जाता त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार राहतो. संगीतामधून विष व अमृत दोन्ही तयार होते पण आपल्याला काय घ्यायचे हे आपल्यावर ती अवलंबून असते. गर्भावस्थेपासून आपण संगीत ऐकू शकतो. संगीत म्हणजे नुसते वाद्य नसून पारंपरिक गीते सुद्धा यांचा समावेश होतो.
आपल्या अंगी असलेल्या भावभावनांना आळाफाटा देऊ नका. रडावेसे वाटले रडा, हसावेसे वाटले तर हसा. राग व्यक्त करावासा वाटला तर राग व्यक्त करा. आईच्या अंगाई गीतांमधून आई-वडिलांच्या स्नेहप्रेमातून आपल्या शरीरामध्ये विविध विकार श्रवतात. यामुळे कोणत्याही भावनांना न भिता आणि व्यक्त करण्याची सवय लावा.
सूत्रसंचालन सुनील वानखेडे यांनी, तर आभार योगेश इंगळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोटरी क्लब आॅफ सांगलीचे प्रेसिडेंट सुधाकर सनांसे, प्रोजेक्ट वॉटर प्रदीप सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: The ability to change a person's life in music - Dr. Santosh Borade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.