भडगाव परिसरात पावसाने अर्धा भरला गिरणा नदीवरचा बंधारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 04:14 PM2019-08-14T16:14:23+5:302019-08-14T16:14:45+5:30
भडगाव तालुक्यात १५ दिवस सतत जिरता पाऊस झाला. पिकांसाठी पाऊस फायद्याचा ठरला. मात्र ना नाल्यांना पूर, ना गिरणा नदीला पूर. यामुळे जमिनीत पाणी न मुरल्याने विहिरींच्या पाणी पातळीत थोडीही वाढ झालेली नाही. मात्र भडगाव परिसरात या आठवड्यात झालेल्या पावसाने व भडगाव परिसरातील गिरणा नदीकाठच्या गाव शेतशिवाराचे पाणी भडगाव येथील गिरणा नदीवरच्या कच्च्या बंधाऱ्यात जवळपास निम्मे पाणी साचलेले आहे.
अशोक परदेशी
भडगाव, जि.जळगाव : भडगाव तालुक्यात १५ दिवस सतत जिरता पाऊस झाला. पिकांसाठी पाऊस फायद्याचा ठरला. मात्र ना नाल्यांना पूर, ना गिरणा नदीला पूर. यामुळे जमिनीत पाणी न मुरल्याने विहिरींच्या पाणी पातळीत थोडीही वाढ झालेली नाही. मात्र भडगाव परिसरात या आठवड्यात झालेल्या पावसाने व भडगाव परिसरातील गिरणा नदीकाठच्या गाव शेतशिवाराचे पाणी भडगाव येथील गिरणा नदीवरच्या कच्च्या बंधाऱ्यात जवळपास निम्मे पाणी साचलेले आहे.
पावसाळयात गिरणा नदीचे कोरडे पडलेले पात्र बंधारा परिसरात जलाशयाने साचल्याने नागरिकात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या बंधाºयाच्या पाण्याने शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी फायद्याचे ठरणार आहे. पालिका प्रशासनाला पाण्याचे नियोजन करणे सध्या सोयीचे ठरणार आहे. सध्या तीन-चार दिवसात शहरात पाणीपुरवठा केला जात आहे.