जळगाव शहराचा दोन तृतीयांश भाग अस्वच्छ

By admin | Published: June 19, 2017 10:53 AM2017-06-19T10:53:43+5:302017-06-19T10:53:43+5:30

‘जळगाव फस्र्ट’चा दावा : 696 ठिकाणी प्रचंड घाण; सव्रेक्षणाद्वारे सफाईचे ‘सोशल ऑडीट’

About two-thirds of Jalgaon city is unclean | जळगाव शहराचा दोन तृतीयांश भाग अस्वच्छ

जळगाव शहराचा दोन तृतीयांश भाग अस्वच्छ

Next

 ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.19 :  सफाई मक्ते व मनपाचा आरोग्य विभाग यावर मनपातर्फे दरमहा कोटय़वधींचा खर्च करूनही शहरात घाणीचे साम्राज्य कायम असल्याचे जळगाव फस्र्टतर्फे रविवारी 300 स्वयंसेवकांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सफाईच्या मेगा सव्रेक्षणाद्वारे (सोशल ऑडीट) समोर आले. त्यात शहरातील तब्बल दोन तृतीयांश भागात 696 ठिकाणी अस्वच्छता आढळून आल्याचा दावा करण्यात आला आहे.
याबाबतचा अहवाल दोन दिवसात मनपा आयुक्तांना सादर करण्यात यईल. या विषयाचा सविस्तर अभ्यास करून  उपाययोजनांचा कृती आराखडाही मांडला जाईल, अशी माहिती डॉ.राधेश्याम चौधरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 
6 ते 10 दरम्यान झाले सव्रेक्षण
शहरातील  37 प्रभागांपैकी 22 प्रभागांमध्ये ठेक्याच्या तर 15 प्रभागांमध्ये मनपाच्या माध्यमातून होत असलेल्या स्वच्छतेच्या कामांचे सोशल पब्लिक ऑडिट जळगाव फस्र्ट या सेवाभावी व स्वयंसेवी संघटनेतर्फे डॉ.राधेश्याम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी सकाळी 6 ते 10 या वेळेत करण्यात आले. 
प्रभाग समितीच्या कार्यक्षेत्रात घाण
शहरातील चारही प्रभाग समितीच्या कार्यक्षेत्रात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरल्याचे दिसून आले. अनेक भागांमध्ये नियमित स्वच्छता होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी प्रत्यक्ष स्वयंसेवकांना भेटून तसेच फोनवरून केल्या. एकूणच कमी झाडू कामगार, गटारीं कामगारांकडून प्रभागांची स्वच्छता करून घेण्याचा प्रकार सुरू असल्याने दोन ते तीन दिवसाआड साफसफाई होत असल्याचे निदर्शनास आले आहे. 
696 ठिकाणच्या समस्या फोटोसह प्राप्त
या सव्रेक्षणासाठी जळगाव फस्र्टच्या कार्यकत्र्याचे शहराचे सहा विभाग पाडून त्यानुसार सहा व्हॉटस्अॅप ग्रुप करण्यात आले होते. जळगाव फस्र्टचे कार्यकर्ते हे त्यांना नेमून दिलेल्या विभागांमध्ये फिरून तेथील कच:याचे, तुंबलेल्या गटारी, ओसंडणा:या कचराकुंडय़ा यांचे फोटो  व्हॉटस्अॅप ग्रृपवर टाकत होते. असे एकूण 746 समस्यांचे फोटो या मोहीमेत प्राप्त झाले. त्यापैकी 54 फोटो पुन्हा आलेले असल्याने ते वगळून 696 ठिकाणी म्हणजेच सुमारे दोन तृतीयांश शहरात अस्वच्छता असल्याने तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे आढळून आले. 
 
70 टक्के कचराकुंडय़ा भरलेल्या
शहरातील कचराकुंडय़ांची संख्या लोकसंख्येच्या व शहराच्या विस्ताराच्या तुलनेने पुरेशी नाही. ज्या कचराकुंडय़ा आहेत, त्या देखील नियमितपणे साफ केल्या जात नाहीत. या सव्रेक्षणात 70 टक्के कचराकुंडय़ा कच:याने ओसंडत असल्याचे दिसून आले. केवळ 30 टक्के कचराकुंडय़ा साफ  दिसून आल्या. तसेच या कचराकुंडय़ांमध्ये कचरा जाळला जात असल्याने त्या तुटल्या आहेत. 10 ते 15 टक्के कचराकुंडय़ा तुटलेल्या आढळून आल्या.
 
झोपडपट्टय़ाच नव्हे उच्चभ्रू वसाहतींमध्येही घाणीचे साम्राज्य
जळगाव फस्र्टच्या माध्यमातून शहरातील 75 टक्के भागात सव्रेक्षण करण्यात आले. त्यात केवळ झोपडपट्टीतच नव्हे तर मुख्य बाजारपेठ, उच्चभ्रू वस्तीमध्ये देखील अस्वच्छता असल्याचे आढळून आले. 
 
अयोध्यानगर, खोटेनगर सर्वाधिक अस्वच्छ
या पाहणीत अयोध्यानगर, खोटेनगर, निवृत्तीनगर, मुक्ताईनगर, गेंदालाल मिल, नवीपेठ परिसर आदी भागात सर्वाधिक अस्वच्छता असल्याचे आढळून आले. 
 
शहरातील साफसफाईच्या समस्येचे गांभीर्य मनपाला कळावे यासाठी या सव्रेक्षणाची घोषणा होताच मनपा आरोग्य विभाग व सफाई मक्तेदार सतर्क झाले होते. त्यामुळे प्रथमच अनेक ठिकाणी व्यवस्थित सफाई करण्यात येऊन सर्व आलबेल दाखविण्याचा प्रय}ही झाला. ज्या ठिकाणी  8-10 दिवस सफाई कर्मचारी फिरकत नाहीत, अशा ठिकाणीही सफाईचे काम करण्याची कर्मचारी पोहोचले. या सव्रेक्षणातील निष्कर्षाचा अभ्यास करून त्या सोडविण्यासाठी कृती आराखडाही सादर करणार आहोत.                                                 - डॉ.राधेश्याम चौधरी, संस्थापक, जळगाव फस्र्ट 
 
 जळगाव फस्र्ट या संस्थेतर्फे शहरातील सफाईबाबतच्या सव्र्हेचा अहवाल देण्यात येणार आहे. त्यात मनपाच्या काय त्रुटी आहेत? ते समजले तर निश्चित दुरूस्त करण्यात येतील. जळगाव फस्र्टचा हा चांगला उपक्रम आहे. कोणतीही संस्था शहरातील प्रश्नांमध्ये लक्ष घालत असेल तर चांगली बाब आहे. शहर स्वच्छतेसाठी मनपा प्रशासन कटीबध्द आहे.
-जीवन सोनवणे, मनपा आयुक्त

Web Title: About two-thirds of Jalgaon city is unclean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.