अबब...! कांद्याची पात, लांब दोन हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 07:31 PM2019-03-18T19:31:41+5:302019-03-18T19:33:22+5:30
गिरणा काठाने बहाळ सोडले म्हणजे जामदा रस्त्यावर एका कांद्याच्या शेतावर नजर जाताच शेतीतील आवड असणारा हमखास थांबत कांद्याची पात व पोसलेला कांदा पाहून तोंडात बोटं घालतो. ती शेती असते कापूस, केळी व कांदा असा तीन ‘क’चा वेड लागलेल्या जामदा येथील शेतीनिष्ट शेतकरी योगेंद्र धनसिंग पाटील यांची.
संजय हिरे
खेडगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : गिरणा काठाने बहाळ सोडले म्हणजे जामदा रस्त्यावर एका कांद्याच्या शेतावर नजर जाताच शेतीतील आवड असणारा हमखास थांबत कांद्याची पात व पोसलेला कांदा पाहून तोंडात बोटं घालतो. ती शेती असते कापूस, केळी व कांदा असा तीन ‘क’चा वेड लागलेल्या जामदा येथील शेतीनिष्ट शेतकरी योगेंद्र धनसिंग पाटील यांची.
दुष्काळाने केला वांदा, लावला कांदा
खरे तर योगेंद्र पाटील यांनी पावसाळ्याच्या तोंडावर आपल्या ३० एकरावरील क्षेत्रात केळी लागवडीचे नियोजन केले होते. पाच लाखात तब्बल २० हजार केळीची रोपेही बूक केली होती. मात्र पावसाने दगा दिला. दुष्काळ पडला. १२ हजार रोपे फेकून द्यावी लागली आणि योगेंद्र पाटील यांनी आपला अनुभव लक्षात घेत नियोजन बदलवत कमी दिवसात, कमी पाण्यात येणाऱ्या कांद्याचे नियोजन केले.
अन् वेहेळगावचे कांदा रोप संपविले
कांदा लागवडीसाठी रोपे तयार करण्यात दीड-दोन महिना घालविण्यापेक्षा त्यांनी आयते तयार रोप घेण्यासाठी नांदगाव तालुक्यातील वेहेळगाव गाठले. तिकडेही दुष्काळामुळे लागवडीविना पडून असलेले रोप त्यांना मिळाले. ७५ हजारात झाडून साºया वेहेळगावातील रोपे आणली. नोव्हेंबर महिन्यात पाच एकरावर उन्हाळी कांदा लावला. खते, पाणी निगा राखली. तणनाशक वापरुन निंदणीचा खर्च वाचविला.
गिरणा काठची कसदार जमीन, गिरणामाईचे अमृतावाणी पाणी, कांदा पीक असे पोसले की रस्त्याने जाणाºया-येणारी पावले शेतावर थांबू लागली. हिरवीगार दीड-दोन हात लांब पात, पावशेरापर्यत पोसलेला दगडी वजनाचा कांदा. अक्षरश: वाढलेली पात वाºयामुळे जमिनीवर लोळण घेत आहे. एकरी अडीचशे क्विंटलच्या वर उत्पादन येण्याची खात्री शेतकºयाला आहे.
शेतीतील तीन ‘क’चा लळा
कुणी चांगली म्हणावी, अशी नव्हे तर फायद्याची शेती कशी ठरेल यात आपण प्राधान्याने लक्ष घालत असल्याचे शेतकरी योगेंद्र पाटील सांगतात. केळी, कापूस व कांदा असा तीन ‘क’चा आपणास लळा लागला असून, दुसरे पीक घेत नसल्याचे ते अभिमानाने सांगतात.