कोल्हे फरार; अन्य संशयित निष्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 01:13 PM2020-01-21T13:13:34+5:302020-01-21T13:13:43+5:30

जळगाव : बांधकाम व्यावसायिंक खुबचंद साहित्या यांच्यावर हल्ला झाल्याच्या प्रकरणात या गुन्ह्यात मुख्य आरोपी असलेले माजी महापौर ललित कोल्हे ...

 Absconding; Other suspects executed | कोल्हे फरार; अन्य संशयित निष्पन्न

कोल्हे फरार; अन्य संशयित निष्पन्न

Next


जळगाव : बांधकाम व्यावसायिंक खुबचंद साहित्या यांच्यावर हल्ला झाल्याच्या प्रकरणात या गुन्ह्यात मुख्य आरोपी असलेले माजी महापौर ललित कोल्हे फरार असून त्यांच्या साथीदारांनाही अद्याप अटक झालेली नाही. दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील डिव्हीआर तपासल्यानंतर अन्य मारेकरी निष्पन्न करण्यात आली आहेत, मात्र त्यांची नावे जाहीर करण्यास पोलिसांनी नकार दिला.
नवी पेठेतील गोरजाबाई जिमखान्यात खुबचंद साहित्या यांच्यावर १६ रोजी हल्ला झाला होता. हा हल्ला माजी महापौर ललित कोल्हे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केल्याचा आरोप साहित्या यांनी केला आहे. त्यानुसार कोल्हे व इतर ५ ते सहा जणांविरुध्द खुनाचा प्रयत्न, खंडणी, दंगल व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या प्रकरणात पोलिसांनी सोमवारी राजू आडवाणी, राष्टÑवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील व इतर काही लोकांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यांच्याकडून माहिती घेण्यात आली.

वरिष्ठ पातळीवर चर्चेचे गुºहाळ
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत राजकीय पातळीवर वरिष्ठ स्तरावर बैठकांचे सत्र सुरु आहे, त्यामुळेच या गुन्ह्यात अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही. म्हणूनच कि काय पोलीस स्टेशन पातळीवर अधिकारी व कर्मचारी हालचाल करीत नाहीत. दरम्यान, पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी रविवारी पोलीस निरीक्षक अरुण निकम यांच्याकडून गुन्ह्यात अद्यापपर्यंत काय निष्पन्न झाले, याची माहिती घेतली.

Web Title:  Absconding; Other suspects executed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.