अल्पवयीन मुलीवर अत्याचार; फरार संशयिताला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:19 AM2021-08-29T04:19:25+5:302021-08-29T04:19:25+5:30
जळगाव : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून फरार झालेल्या धरम मोइद्दिन तडवी (वय ३१, रा. नवी सांगवी, पहूर, ता. जामनेर) ...
जळगाव : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून फरार झालेल्या धरम मोइद्दिन तडवी (वय ३१, रा. नवी सांगवी, पहूर, ता. जामनेर) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी गोदरीतांडा, ता. जामनेर येथील शेतातून अटक केली.
तडवी याने २० ते २४ ऑगस्टदरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी फिरवून एका १४ वर्षीय मुलीवर अत्याचार केला होता. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात २७ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल झाला होता. तडवी हा फत्तेपूरनजीकच्या गोदरी तांडा येथील एका शेतात आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी शनिवारी सहायक फौजदार अशोक महाजन, किशोर राठोड, रणजीत जाधव, कृष्णा देशमुख व विनोद पाटील यांचे पथक रवाना केले. दुपारी ताब्यात घेतल्यानंतर त्याला पिंपळगाव हरेश्वर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.