मुलाला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार

By सागर दुबे | Published: May 3, 2023 03:30 PM2023-05-03T15:30:24+5:302023-05-03T15:34:18+5:30

रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पिडित महिला ही पती व दोन मुलांसह राहते.

Abuse of a woman by luring her son to get a job In jalgaon | मुलाला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार

मुलाला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार

googlenewsNext

जळगाव : मुलाला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत अडीच लाखांसह दागिने घेवून भुसावळातील एका व्यक्तीने ४० वर्षीय महिलेवर वेळोवेळी अत्याचार केल्याचा प्रकार रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत समोर आला आहे. याबाबत महिलेने पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पिडित महिला ही पती व दोन मुलांसह राहते. गेल्या चार वर्षांपासून महिलेची भुसावळ येथील व्यक्तीशी ओळख आहे. त्या व्यक्तीला नवीन घर घेणे असल्यामुळे त्याचे महिलेच्या घरी ये-जा सुरू होते. एके दिवशी त्याने मी ऑर्डनन्स फॅक्टरी येथे कामाला असून कोणाला नोकरीला लावायचे असेल तर माझ्याशी संपर्क साधा, असे महिलेला सांगितले. त्यावेळी महिलेने माझ्या मुलाला नोकरीला लावून द्या, आम्ही पैसे भरण्यास तयार आहे, असे सांगितले. त्यामुळे त्या व्यक्तीचे महिलेचे घरी येणे जाणे आणखी वाढले. त्यात महिलेने मुलाच्या नोकरीसाठी अडीच लाख रूपयांची रक्कम आणि १५ ग्रॅम सोन्याचे दागिने दिले. त्यानंतर वर्षभर त्या व्यक्तीने महिलेवर मुलाला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत अत्याचार केले. तर शारीरिक संबंध प्रस्तापित करण्यास नकार दिला तर मुलाला नोकरी लावून देणार नाही, अशीही धमकी देत होता. अखेर त्या व्यक्तीचा त्रास सहन न झाल्यामुळे महिलेने मंगळवारी रामानंदनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Abuse of a woman by luring her son to get a job In jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.