दुधात झोपेच्या गोळ्या देऊन विवाहितेवर अत्याचार; गुन्हा दाखल

By सागर दुबे | Published: April 5, 2023 03:19 PM2023-04-05T15:19:24+5:302023-04-05T15:21:05+5:30

पतीसह मुलांना मारुन टाकण्याचे सांगत ब्लॅकमेलिंग

abuse of married woman by giving sleeping pills in milk filed a case | दुधात झोपेच्या गोळ्या देऊन विवाहितेवर अत्याचार; गुन्हा दाखल

दुधात झोपेच्या गोळ्या देऊन विवाहितेवर अत्याचार; गुन्हा दाखल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ३० वर्षीय विवाहितेला जयदीप सुरेश पाटील (३०) याने दुधात झोपेच्या गाळ्या देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. एवढेच नव्हे तर ही गोष्ट जर कुणाला सांगितली तर तुझासह पती व मुलांचा खून करेल, अशीही धमकी दिली. याबाबत विवाहितेने मंगळवारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विवाहितेचा पती हा शासकीय कर्मचारी आहे. वर्षभरापूर्वी पतीची जळगावात बदली झाली. त्यामुळे जळगावात भाड्याचे घर शोधणे सुरू होते. त्या काळात घर शोधण्याच्या निमित्ताने विवाहिता व त्याच्या पतीची जयदीप सुरेश पाटील याच्याशी ओळख झाली. नंतर पाटील याचे विवाहितेच्या घरी येणे-जाणे वाढले. काही महिन्यांपूर्वी विवाहितेच्या पतीची पुन्हा बदली झाली. त्यामुळे जयदीप याला घराकडे लक्ष देण्याचे सांगितले होते. त्यामुळे तो अधून-मधून विवाहितेच्या घरी येऊन जवळीक साधू लागला. एके दिवशी त्याने शारीरिक सुखाची मागणी केली. मात्र, विवाहितेने त्यास नकार दिल्यावर तो विवाहितेसह तिच्या पती व मुलांचा खून करून टाकेल, अशी धमकी देवू लागला.

दरम्यान, पंधरा दिवसांपूर्वी विवाहिता ही आजारी पडली. जयदीप पाटील हा विवाहितेच्या घरी आल्यानंतर त्याने तिला दुधात काहीतरी गोळ्या दिल्या. याबाबत विवाहितेने त्याना विचारणा केली होती. मात्र, तरीही तीन ते चार दिवस पुन्हा त्याने झोपेच्या गोळ्या दिल्या. दरम्यान, विवाहिता झोपल्यानंतर तो तिच्यावर अत्याचार करत होता. हा प्रकार विवाहितेच्या लक्षात आला. नंतर पाटील याने ही गोष्ट जर कुणाला सांगितली तर तुझ्यासह पती व मुलांचा खून करेल, अशी धमकी दिली. त्यानंतर सोमवारी विवाहितेच्या पतीला त्याने संपर्क साधून शिवीगाळ करून धमकी दिली.

शेवटी विवाहितेने सायंकाळी विषप्राशन करून जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार गल्लीतील लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी विवाहितेला जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. अखेर मंगळवारी विवाहितेने दिलेल्या जबाबावरून जयदीप सुरेश पाटील याच्याविरूध्द रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक रोहिदास गभाले हे करीत आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: abuse of married woman by giving sleeping pills in milk filed a case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.