जैविक कचराच्या संकलनात गैरव्यवहार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:17 AM2021-05-21T04:17:20+5:302021-05-21T04:17:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरासह जिल्ह्यातील रुग्णालयांमधून जमा होणाऱ्या जैविक कचऱ्याच्या संकलनात ठेकेदाराने गैरव्यवहार करून मनपा प्रशासनाची फसवणूक ...

Abuse in organic waste collection? | जैविक कचराच्या संकलनात गैरव्यवहार ?

जैविक कचराच्या संकलनात गैरव्यवहार ?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरासह जिल्ह्यातील रुग्णालयांमधून जमा होणाऱ्या जैविक कचऱ्याच्या संकलनात ठेकेदाराने गैरव्यवहार करून मनपा प्रशासनाची फसवणूक केल्याचा आरोप शहरातील दिनेश भोळे यांनी केला आहे. याबाबत भोळे यांनी मनपा प्रशासनाकडे तक्रार करून याबाबत कारवाईची मागणी केली आहे. या तक्रारीची दखल घेत मनपा प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले असून, ठेकेदाराकडून खुलासादेखील मागविण्यात आला आहे.

शहरातील दैनंदिन साफसफाई करणाऱ्या वॉटर ग्रेस कंपनीच्या कारभाराचा प्रश्न एकीकडे गाजत असताना, आता दुसरीकडे जळगाव शहरासह जिल्हाभरातील रुग्णालयांमधून जमा होणाऱ्या जैविक कचरा संकलनात ठेकेदार माॅन्साई बायोमेडिकल वेस्ट या कंपनीने मनपाच्या अटी व शर्तींचा भंग करून, काही रुग्णालयांमधून कचरा संकलन करून देखील त्या रुग्णालयाची यादी महापालिका प्रशासनाकडे सादर न करताच, तसेच त्यातून मिळणाऱ्या रकमेची रॉयल्टी मनपाकडे जमा न करताच मनपा प्रशासनाची फसवणूक केल्याची तक्रार दिनेश भोळे यांनी केली आहे. याबाबत भोळे यांनी माहितीच्या अधिकाराखाली माहितीही जमा करून मनपा प्रशासनाकडे तक्रार केली आहे.

काय आहे प्रकरण

१. मनपा प्रशासनाने २००६ साली माॅन्साई बायो मेडिकल वेस्ट या कंपनीला शहरातील रुग्णालयांमधून जमा होणारा कचरा संकलित करण्याचा ठेका दिला होता. तसेच मनपाने जिल्हाभरातून येणारा जैविक कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी या कंपनीला मनपा हद्दीत बीओटी तत्त्वावर जागादेखील उपलब्ध करून दिली होती.

२. हा करार २० वर्षांसाठी देण्यात आला असून, १ ते ६ वर्षांसाठी ठेकेदाराला मनपा प्रशासनाला १३ टक्के रॉयल्टी द्यावी लागणार होती. ६ ते १२ वर्षांसाठी १७ टक्के, तर १२ ते मुदत संपेपर्यंत २० टक्के रॉयल्टी द्यावयाची आहे.

३. मात्र, संबंधित ठेकेदाराने जळगाव, भुसावळ व चोपडा शहर येथून जमा होणारी रक्कम मनपा प्रशासनाला दाखवून अनियमित पद्धतीने भरणा केला, तर इतर तालुक्याच्या ठिकाणावरील कचऱ्याची कोणतीही माहिती किंवा त्याबद्दलची रॉयल्टी मनपाकडे देण्यात आलेली नसल्याचा आरोप भोळे यांनी केलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे.

कोट..

भोळे यांची तक्रार प्राप्त झाली असून, याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच संबंधित ठेकेदाराकडूनदेखील खुलासा मागविण्यात येणार आहे.

- पवन पाटील, सहायक आयुक्त, मनपा

Web Title: Abuse in organic waste collection?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.