पेन्शनच्या रकमेतून जि.प.शाळेच्या विद्याथ्र्याना शैक्षणिक मदत
By admin | Published: July 1, 2017 02:42 PM2017-07-01T14:42:20+5:302017-07-01T14:42:20+5:30
पुण्यातील फेसबुक मित्र लळींगकर झाले मुलांचे आवडते आजोबा
Next
सुधाकर देवरे/ऑनलाईन लोकमत
गणेशपूर ता.चाळीसगाव,दि.1 - शाळेतील गरीब,गरजू मुलांच्या चेह-यावर आनंद फुलवणारे पुण्यातील जेष्ठ नागरिक रामचंद्र लळींगकर हे ख-या अर्थाने जि.प.केंद्रशाळा तळेगाव या शाळेतील मुलांचे आजोबा झाले आहेत. पेन्शनच्या रकमेतून विद्याथ्र्याना शैक्षणिक साहित्याची ते मदत करीत आहेत.
लळींगकर हे गेल्या दोन वर्षांपासून त्यांना मिळणा-या पेन्शन मधील पैसे साठवून या शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यासाठी मदत पाठवतात. जवळपास 15 हजारांची मदत त्यांनी केली आहे. फेसबुकच्या माध्यमातून झालेली मैत्री आणि शाळेतील चिमुकल्यांना बक्षिसांची लयलूट यामुळे हे फेसबुक मित्र सर्व मुलांना आवडते झाले आहे.
लळींगकर आजोबांकडून मिळालेल्या निधीतून चाळीसगाव तालुक्यातील या शाळेत आजपयर्ंत वह्या, पेन, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, लाकडीपट्ट्या, रंगखडू, रंगभरण डिश, दप्तर इ.साहित्य वाटप करण्यात आलं. मागील शैक्षणिक वर्षात बालिका दिनाच्या निमित्ताने आयोजित बक्षीस समारंभाची बक्षीस देखील लळींगकर यांनी पाठवली होती.
जाऊ तिथं खाऊच्या जमान्यात जाऊ तिथं देऊहे या आजोबांचं धोरण आहे. आपलं दान सत्पात्री दिलं जातंय हे लक्षात आलं की यथाशक्ती मदत करायला ते सदैव तयार असतात. तेही कोणतीही प्रसिद्धी न करता. त्यांची गरजूंना दान देण्याची ही कृती इतरांसाठी प्रेरणा देणारी आणि मराठी माध्यमाच्या शाळांसाठी निश्चितच आश्वासक आहे, असे या शाळेचे शिक्षक संभाजी पाटील यांनी आवजरून सांगितले.
लळींगकर यांच्याशी असा झाला होता संपर्क
शाळेतील शिक्षक संभाजी पाटील यांनी एकदा आपल्या अकांऊटवर आपल्याच शाळेतील आई नसणारी व बापानेही टाकून दिलेल्या आजोबाकडे शेतात राहून शिकणा:या मुलीची पोष्ट टाकली होती.रामचंद्र लळींगकर यांची मुलगी अपर्णा लळींगकर यांनी त्या मुलीची कहाणी वाचून 1000 रुपये मदत म्हणून पाठविले. मराठी शाळा वाचल्या पाहिजेत या ब्लाँगवर त्यांची ओळख झाली. अपर्णा लळींगकर त्यावेळी बंगळूर येथे होत्या. आता त्या इस्नईल मध्ये आहेत. त्यामुळे एके दिवशी संभाजी पाटील यांनी अपर्णा लळींगकर यांचे वडील रामचंद्र लळींगकर यांना फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठावली व त्यानंतर त्यांच्याच मुलीची दातृत्वाची कहाणी सांगितल्यावर क्षणाचाही विचार न करता लळींगकर यांनी आपल्या पेन्शन मधून साठावलेले 15000 रुपये शाळेतील विद्याथ्र्यांना शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी दिले.