स्वीकार बांठीया सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:15 AM2021-07-25T04:15:56+5:302021-07-25T04:15:56+5:30

स्वीकार बांठीया हा सध्या बनारस हिंदू विद्यापीठ शिक्षण घेत असून त्याने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (बनारस हिंदू युनिव्हर्सिटी) च्या ...

Accept Banthiya honored | स्वीकार बांठीया सन्मानित

स्वीकार बांठीया सन्मानित

Next

स्वीकार बांठीया हा सध्या बनारस हिंदू विद्यापीठ शिक्षण घेत असून त्याने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (बनारस हिंदू युनिव्हर्सिटी) च्या ऑटोमोबाईल रिसर्च टीम एव्हरेरा टीमचे नेतृत्व केले आणि शेल इको-मॅरेथॉन २०२१ या जागतिक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावून संस्थेसह देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. या स्पर्धेत जगातील ५० देशांमधील २३५ संघांनी सहभाग नोंदवला त्यात स्वीकार राजेश बांठीया याने नेतृत्व केलेल्या टीम एव्हरेरा या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. टीम एव्हरेराला ८२५० अमेरिकन डॉलर्सची रक्कम मिळाली आहे.

यावेळी मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका पी. एम. वाघ, पर्यवेक्षक आर. एल. पाटील, एन. आर. ठाकरे आणि ए. बी. अहिरे, तांत्रिक विभाग प्रमुख एस. एन. पाटील, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनीष बाविस्कर, कार्यालयीन अधीक्षक अजय सिनकर उपस्थित होते.

240721\save_20210724_163640.jpg

स्वीकार राजेश बांठीया याचा सन्मान करताना चेअरमन संजय वाघ आणि मान्यवर

Web Title: Accept Banthiya honored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.