Accident : ४० फूट दरीत कोसळली बस ; पाच जणांचा मृत्यू तर ३४ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 01:01 PM2020-10-21T13:01:24+5:302020-10-21T13:01:47+5:30

रात्री अडीच वाजेची घटना ; नंदुरबारातील कोंडाईबारी घाटात अपघात

Accident: Bus crashes into 40 feet valley; Five killed and 34 injured | Accident : ४० फूट दरीत कोसळली बस ; पाच जणांचा मृत्यू तर ३४ जखमी

Accident : ४० फूट दरीत कोसळली बस ; पाच जणांचा मृत्यू तर ३४ जखमी

Next

नंदुरबार / जळगाव : एका खाजगी ट्रॅव्हल्स बस ने मागून दुसऱ्या बस ला मागून जबर धडक दिल्याने ४० फूट खोल दरीत बस पडल्याने ५ जण जागीच ठार तर ३४ जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास विसरवाडीहुन १५ किमी अंतरावर कोंडाईबारी घाटात घडली. घटना स्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक व इतर अधिकारी थांबून आहेत. अद्याप मृतांची ओळख पटलेली नसून त्यांचे ओळख पटविण्‍याचे काम पोलीस करीत आहेत.

जळगाव येथून सुरत कडे निघालेली किंग ट्रॅव्हल्सच्या खाजगी बसला शुभम ट्रॅव्हल्सच्या खाजगी बसने मागून जबर धडक दिली. दरम्यान, वळणावर झालेल्या या धडकेत शुभम ट्रॅव्हल्सची बस सुमारे ४० फूट खोल नाल्यात फरफटत जाऊन पलटी झाली. सोमवारी मध्यरात्री झालेल्या या अपघातात पाच जण जागीच मृत पावले तर ३४ जण जखमी झाले. त्यात काहींची प्रकृती गंभीर आहे. बस मधे जळगाव येथील १४ तर सुरत येथील २० प्रवासी होते. पैकी तीन जणांना सुरत येथे, एकास जळगांवला तर अन्य २६ जणांना नंदुरबार येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

कोंडाईबारी घाटात असलेल्या कॉन्व्हॉय पॉईंटची पोलीस चौकी जवळच असल्याने तेथे तैनात कर्मचारी यांनी अन्य वाहन चालकांच्या मदतीने जखमींना बस बाहेर काढून रुग्णालयात पाठविले. जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत व अन्य अधिकारी घटना स्थळी धावून गेले असून तेथेच थांबून आहेत. मयतांची ओळख पटविण्याचे कार्य सुरु आहे. अपघातानंतर घटनास्थळी चांगलीच गर्दी झाली होती. चाळीस फूट दरीत कोसळल्यामुळे बसचा पुढील भाग पूर्ण् चक्काचूर झालेला होता.

असे आहेत जखमी
मोनिका पवन मारोती (१७), अनिलसिंग सदानंद (५२), शोभा अनिलसिंग (४८), श्रेयस पवन पोगलिया (१३), नासीर पठाण (३०), मुकेश चंपकलाल जैन (४०), बलराम सिमनदास वालेचा (५२), पुष्पा विलास पाटील (५५), उर्वषी विनोद पाटील (१०), सैय्यद रियाज (१५), सैय्यद हारून (३५), सैय्यद अफगान (३५), सैय्यद जोया (१३), सुफिया बी अनिफ शहा (३५), रोशनी अमर बारी (२३), आयुश बारी (०५), फारूख शेख गनी (५२), सुफीया बी अतिक शहा (५०), मुकेश रामचंद्र (३७, सर्व रा. सुरत), तसेच शेख खलील शेख इसा (५५), खुशीलदी अय्युब रबी, जेयश भानुदास वाघरे (२८), प्रिया समाधान पाटील (०९), भाग्यश्री समाधान पाटील (०२), नीलेश शांताराम धनगर (२१), शांताराम किसन धनगर (३८), उषाबाई शांताराम धनगर (३५), राजेश धरमदास मतानी (५०), सिध्दार्थ संजय बि-हाडे (२०), विवेक राजेश मतानी (१९), समाधान लालचंद पाटील (३७), रेखा समाधान पाटील (३५), अय्युब पठाण (५४), अस्वरबी अय्युब खान (५०, सर्व रा.जळगाव) हे बस अपघात जखमी झालेले आहे. अद्याप मृतांची ओळख पटलेली नाही.

 

Web Title: Accident: Bus crashes into 40 feet valley; Five killed and 34 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.