धानोरा-पंचक दरम्यान अपघात- एक जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 12:16 AM2019-10-17T00:16:10+5:302019-10-17T00:16:15+5:30

दारुच्या नशेत मोटारसायकल स्वारास उडवले

Accident during Dhanora-Panchak - killed at one place | धानोरा-पंचक दरम्यान अपघात- एक जागीच ठार

धानोरा-पंचक दरम्यान अपघात- एक जागीच ठार

Next




बिडगाव, ता.चोपडा : अंकलेश्वर बºहाणपूर महामार्गावरील धानोरा-पंचकदरम्यान एका चारचाकी गाडीने मोटारसायकल स्वारास उडवले. यात एक जण जागीच ठार झाला. दरम्यान चारचाकी गाडीतील चालकासह दोघांना पूर्णत: दारुची झिंग चढलेली होती. यावेळी घटनास्थळी जमलेल्या संप्तत जमलेल्या जमावाने अपघातातील गाडी पेटवुन दिली.
याबाबत सविस्तर असे की, येथुन जवळच असलेल्या बिडगाव येथील प्रगतशिल शेतकरी विश्वास आत्माराम पाटील (वय ५५) हे खाजगी कामानिमित्त अडावद येथे गेले होते. तिकडून घराकडे परत येताना धानोरा-पंचक दरम्यान असलेल्या गवळी नाल्याजवळ संध्याकाळी सातच्या सुमारास मोटारसायकलला क्र.एमएच-१९-सीए-७६४६ आणि धानोराकडून जाणाऱ्या कारने एमएच-१२-एमएफ-५२१६ जोराने धडक दिली. यात मोटारसायकल वर असलेले विश्वास पाटील हे जागीच ठार झाले. अपघातातील कारमध्ये असलल्या दोन जणांपैकी एक जण पळून गेला तर दुसरा उमेश अनिल पाटील यातील एकास जमावाने थेट पोलिस ठाण्यात पोहचविले. दरम्यान गाडीत दारुच्या बाटल्या दिसल्याने जमाव आधिकच भडकला होता. पण वेळीच घटनास्थळी अडावद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश तांदळे, ए.एस.आय जगदिश कोळंबे हे पोहचत महामार्गावरील वाहतुक सुरळीत करुन जमावाला शांत केले. यात उमेश अनिल पाटील यास ताब्यात घेतले असुन एक जण फरार झालेला आहे. यातील दोघेही जण चोपडा तालुक्यातील नामांकीत राजकीय परीवाराचे असल्याचे समजते.
विश्वास पाटील यांचा परिसरात दांडगा जनसंपर्क असल्याने घटनास्थळी धानोरा, बिडगाव, पंचक, मोहरद, लोणी अडावद, खर्डी, वरगव्हानसह अनेक गावातील नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. दारु पिऊन गाडी चालवली व गाडीत ही दारूच्या बाटल्या दिसल्याने संतप्त जमावाने थेट गाडी पेटवली. यात वेळीच अडावद पोलिसांनी, होमगार्ड व ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणली होती.

चौघांनी दारू रिचवली
घटनास्थळावरुन काही अंतरावर असलेल्या एका हॉटेलवर चार जणांनी येथेच्छ दारु रिचवली. जेवणाचे लावलेले टेबल अपूर्ण सोडून हॉटेलवरुन काढता पाय घेतला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगीतले. यात मात्र दोन जण मोटारसायकलवर व दोन जण आरटिका गाडीत निघाले. यात हॉटेलवरील बिलही न देताच निघाल्याने सुसाट गाडी पळवत मोटारसायकलला धडक दिली, अशी माहीतीही समजली.

Web Title: Accident during Dhanora-Panchak - killed at one place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.