जळगावमध्ये पारोळानजीक भीषण अपघात; सुरत येथील मध्यमवयीन दाम्पत्य ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 08:34 PM2024-12-02T20:34:49+5:302024-12-02T20:36:32+5:30
लोण गावाच्या दोन किमी आधीच दुसऱ्या एका कारने त्याच्या कारला जोरदार धडक दिली.
राकेश शिंदे, पारोळा (जि. जळगाव): पारोळानजीक चारचाकींच्या भीषण अपघातात सुरत येथील दाम्पत्य ठार झाले. ही घटना लोणी बुद्रुक ता. पारोळा या गावाजवळ सोमवारी दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास घडली. सुधीर देवीदास पाटील (४७) आणि ज्योती सुधीर पाटील (४२) असे या ठार झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. ते पुतणीच्या लग्नासाठी सूरत येथून कारने लोण बुद्रुक येथे येत होते. लोण गावाच्या दोन किमी आधीच दुसऱ्या एका कारने त्याच्या कारला जोरदार धडक दिली. त्यात वरील दोघे जण जागीच ठार झाले.