मनुदेवीचे दर्शन घेऊन परतताना अपघात, महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:22 AM2021-08-28T04:22:14+5:302021-08-28T04:22:14+5:30
किनगाव/ चुंचाळे ता. यावल : मनुदेवीमातेचे दर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या रिक्षाचा अपघात होऊन मालती रवींद्र वराळे (रा. ...
किनगाव/ चुंचाळे ता. यावल : मनुदेवीमातेचे दर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या रिक्षाचा अपघात होऊन मालती रवींद्र वराळे (रा. खडका) या महिलेचा मृत्यू झाला. तर पाच महिला जखमी झाल्या. याचबरोबर एक मुलगा व मुलीचाही जखमींमध्ये समावेश आहे.
या अपघाताबाबत वृत्त असे की, २७ रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास खडका, किन्ही आणि भुसावळ येथील काही भाविक मनुदेवी मंदिरावरून दर्शन घेऊन रिक्षाने येत असताना आडगावच्या दरम्यान एका वळणावर रिक्षाचे संतुलन बिघडल्याने ती पलटी झाली. यावेळी जखमींपैकी अरुणा मदन सपकाळे (वय ४५ रा.खडका), लक्ष्मी प्रभाकर सपकाळे (वय ४२ रा.खडका), सुनीता महादेव पटोळे, गायत्री महादेव पटोळे आणि ऋषिकेश महादेव पटोळे (१३) सर्व राहणार किन्ही यांना तत्काळ रुग्णवाहिकेद्वारे यावल ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम तिडके यांनी प्रथमोपचार केले. यातील मालती वराळे महिलेची प्रकृती गंभीर असल्याने उपचार घेताना तिचा मृत्यू झाला. जखमींना तत्काळ रूग्णालयात हलवण्यासाठी वढोदा येथील सरपंच संदीप प्रभाकर सोनवणे यांनी मदत केली.