पतंग उडवताना विजेच्या धक्क्याने गंभीर जखमी झालेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 01:53 PM2018-01-15T13:53:01+5:302018-01-15T13:57:04+5:30

पतंग उडवताना विजेचा धक्का लागून जखमी झालेल्या ओम नरेंद्र पवार (वय 13 वर्ष) या बालकाचा सोमवारी (15 जानेवारी) सकाळी 11 वाजता नाशिक येथे मृत्यू झाला. 

The accidental death of 13 year old boy in Jalgoan | पतंग उडवताना विजेच्या धक्क्याने गंभीर जखमी झालेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू

पतंग उडवताना विजेच्या धक्क्याने गंभीर जखमी झालेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू

googlenewsNext

जळगाव - पतंग उडवताना विजेचा धक्का लागून जखमी झालेल्या ओम नरेंद्र पवार (वय 13 वर्ष) या बालकाचा सोमवारी (15 जानेवारी) सकाळी 11 वाजता नाशिक येथे मृत्यू झाला. चोपडा येथील साने गुरुजी कॉलनीतील रहिवासी व पंकज विद्यालयात इयत्ता सातवीत शिकणारा ओम पवार हा मित्रासह रविवारी पंतग उडवत होता. त्यावेळी त्याचा पतंग मुख्य वीज वाहिनीत अडकला होता. पतंग काढतांना ओमला विजेचा जबर धक्का लागला.  त्यात तो ५० ते ६० टक्के भाजला गेला. रविवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घटना घडली होती. 

ओम याला उपचारासाठी नाशिक येथे नेण्यात आले. तिथे उपचार  सुरू असतानाच सोमवारी सकाळी त्याची प्राणज्योत मालविली. ओम हा सनपुले चोपडा येथील आश्रम शाळेतील शिक्षक नरेंद्र पवार यांचा मुलगा होता. 

Web Title: The accidental death of 13 year old boy in Jalgoan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.