भावाला भेटून परतणाऱ्या तरुणाचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:16 AM2021-04-04T04:16:47+5:302021-04-04T04:16:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ओव्हरटेक करणाऱ्या डंपरने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने विनोद वेडू चौधरी (४२,रा. कुंभारखेडा ...

Accidental death of a young man returning from meeting his brother | भावाला भेटून परतणाऱ्या तरुणाचा अपघाती मृत्यू

भावाला भेटून परतणाऱ्या तरुणाचा अपघाती मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : ओव्हरटेक करणाऱ्या डंपरने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने विनोद वेडू चौधरी (४२,रा. कुंभारखेडा ता. रावेर) हे दुचाकीस्वार जागीच ठार झाले. हा अपघात शनिवारी रात्री पावणे आठ वाजता राष्ट्रीय महामार्गावरील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात समोर झाला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद चौधरी हे जळगाव शहरातील पांजरापोळ येथे राहणारे मावस भाऊ यांना भेटायला आले होते. ही भेट व इतर कामे आटपून ते घराकडे दुचाकीने (क्र.एम.एच.१९ डी.एन.१४६२)जात असताना गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय समोर भुसावळकडून जळगावकडे येणाऱ्या हिरव्या रंगाच्या डंपरने ओव्हरटेक करताना दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात ते दुचाकीवरून फेकले गेले. डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक देविदास कुनगर, चंद्रकांत पाटील, संदीप पाटील व एमआयडीसी पोलीस ठाण्याचे किशोर पाटील यांनी तातडीने मृतदेह जिल्हा रुग्णालयात रवाना केला. दरम्यान, धडक देणारा चालक डंपरसह पसार झाला.

एकाचवेळी दोन दुचाकींना धडक

भुसावळकडून येणाऱ्या या डंपरने एकाच वेळी दोन दुचाकींना धडक दिली. दुसरा दुचाकीवरील (क्र. एम.एच.१९ डी.बी.४५३६)दोन जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, अपघातग्रस्त डंपरचा क्रमांक शोधण्यासाठी पोलिसांनी महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. आधारकार्डवरुन मयताची ओळख पटली. रात्री उशिरा पर्यंत नातेवाईक रुग्णालयात आलेले होते.

Web Title: Accidental death of a young man returning from meeting his brother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.