सट्टाबाजारातील बुकींच्या मते ‘इंग्लड’ ठरणार विश्वविजेता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 12:26 PM2019-05-31T12:26:13+5:302019-05-31T12:26:50+5:30
भारत अंतीम सामन्यात धडक मारणार
अजय पाटील
जळगाव : क्रिकेटचा महाकुं भ म्हणजेच विश्वचषक स्पर्धेला गुरुवारपासून सुरुवात झाली असून, ‘वर्ल्डकप’ची
सुुरूवात होण्याआधीच या सामन्यांवर मोठ्या प्रमाणात सट्टा लावण्यात आला असून, जिल्ह्यात देखील कोट्यवधीचा सट्टा लावण्यात आला आहे. बुकींकडून यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत ‘इंग्लड’च्या संघाला पहिलीपसंती दिली असून, भारताला दुसरी पसंती मिळत आहे. क्रिकेटच्या सामन्यांवर मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जातो. जिल्ह्यात देखील सट्ट्याचे मोठे रॅकेट असून, विश्वचषक स्पर्धेचे सामने म्हटले की यावर बोली लावणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते.
विश्वचषक स्पर्धेच्या अंतीम विजेत्यासोबतच कोणता संघ उपविजेता ठरेल, कोणते संघ सेमी फाईनलच्या फेरीपर्यंत जातील यावर देखील सट्टा लावला जात आहे. यासह प्रत्येक सामन्यावर देखील जिल्ह्यात लाखोंचा सट्टा लावण्यात आला आहे.
स्पर्धा सुरु होण्याआधीच बोली लावण्यावर भर
स्पर्धेला गुरुवारपासून सुरुवात झाली असली तरी सट्टा बाजारात स्पर्धा सुरु होण्याआधीच बोली लावण्यावर बुकींचा भर दिसून येत आहे. तसेच स्पर्धा सुरु होण्याआधीच विजेत्या संघाना पसंती दिली तर बोली लावणाऱ्यांना जास्तीचा फायदा होवू शकतो.
तर काही जणांकडून स्पर्धा जशी मध्यावर येते त्यानुसार असलेल्या पॉर्इंट टेबलच्या आधारावर देखील काही बुकींकडून सट्टा लावला जातो.
मात्र, त्यांना होणारा आर्थिक फायदा हा स्पर्धा सुुरु होण्याआधीबोलीलावणाºया बुकींपेक्षा कमी असतो.
भारतावर ५० पैसे तर इंग्लडवर २५ पैसे भाव
स्पर्धेच्या आधी भारतावर सध्या ५० पैसे भाव निश्चित करण्यात आला आहे. तर सर्वात कमी बोली ही इंग्लडच्या संघावर लावण्यात आली असून, सध्या २५ ते ३५ पंैसे भाव इंग्लडवर आहे. आॅस्ट्रेलीयाच्या संघावर ७५ तर दक्षिण अफ्रिकेच्या संघावर देखील ७५ ते ८० पैसे भाव आहे. या हिशोबाने हे चार संघ अंतीम चार मध्ये प्रवेश करतील अशी शक्यता बुकींकडून वर्तविली जात आहे. तर वेस्ट इंडीज, बांग्लादेश व अफगाणिस्तानचे संघ देखील मोठे उलटफेर करून स्पर्धेची रंगत वाढवून धक्कादायक निकाल लावू शकतात. यासाठी काही बुकींनी या संघावर देखील बोली लावली आहे.
खेळाडूंवरही सट्टा
संघासोबतच काही प्रमुख खेळाडूंवर देखील सट्टा लावण्यात आला असून, यामध्ये मालीकाविर पुरस्कारासाठी विराट कोहली, डेव्डीड वॉर्नर, जॉर्ज बटलर, केन विल्यमसन या खेळाडूंना बुकींची पसंती आहे. तसेच प्रत्येक सामन्यावर नाणेफेक कोण जिंकेल, अंतीम अकरामध्ये कोणता खेळाडू असेल, पहिल्या फलंदाजीनंतर कोणता संघ किती धावा करेल, पहिल्या २५ षटकांमध्ये किती धावा होतील याबाबींवर देखील बुकींच्या नजरा असल्याची माहिती सट्टा बाजारातील काही जाणकारांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.