पंचांगानुसार पुढच्या काळात दमदार पावसाचा योग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 10:34 PM2020-07-18T22:34:38+5:302020-07-18T22:34:50+5:30

पावसाचे दिलासादायी भाकीत। नक्षत्रांच्या वाहनांनुसार पर्जन्यमानाचा योग

According to the calendar, heavy rains in the future | पंचांगानुसार पुढच्या काळात दमदार पावसाचा योग

पंचांगानुसार पुढच्या काळात दमदार पावसाचा योग

Next


सुहास शूर। 
जामदा, ता. चाळीसगाव : यंदा पंचांगकर्त्यांनुसार पावसाळ्याचा आरंभ, मध्यान्ह व शेवट या प्रवासात दमदार पावसासह अतिवृष्टीचा योग असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. उष्णतामान अधिक व आॅगष्टच्या सुरुवातीला पाऊस ओढ देईल, असे पंचांगकर्त्यांना वाटते.
दरम्यान, या संपूर्ण प्रवासात पाऊस त्या त्या नक्षत्राच्या वाहनाच्या तालावर नाचणार असल्याचे अर्थात जलवर्षाव करण्याचे संकेत आहेत. त्यानुसार रविवारी सुरू होणाऱ्या पुष्य नक्षत्रात त्याचे वाहन असलेल्या हत्तीच्या सोंडेतून धो धो वर्षाव होण्याची शक्यता आहे तर आॅगस्टच्या दुसºया पंधरवड्यात सूर्य मघा नक्षत्रात प्रवेश करीत आपले वाहन असलेली म्हैस पाण्यात बसण्याच्या योगे अतिवृष्टी संभवते.
आश्लेषात मात्र पाऊस ओढ देईल असा अंदाज आहे.
पुष्य नक्षत्र : वाहन हत्ती
रविवार दि.१९ रोजी रात्री १० वाजून ३६ मिनिटांनी सूर्य पुष्य नक्षत्रात प्रवेश करीत आहे. वाहन हत्ती असून गुरु आणि शनी नीर नाडीत आहेत. त्यामुळे या नक्षत्राचा पाऊस दमदार होईल होण्याची शक्यता राहील, असा पंचांगकर्त्यांचा अंदाज आहे. २० ते २४ जुलै, २८ ,२९, ३० जुलै व १ आॅगस्टला पाऊस अपेक्षित आहे .
आश्लेषा नक्षत्र : वाहन मेंढा
आश्लेषा नक्षत्र २ आॅगस्ट रात्री ९.२८ ला सुरू होते. या नक्षत्राचे वाहन मेंढा असून अग्निमांडल योग असल्याने या नक्षत्राचा पाऊस ओढ धरेल असे दिसते. मात्र नक्षत्राच्या शेवटी पर्जन्यमान सुधारेल. दिनांक २,३,४,१३,१४,१५ आॅगस्ट या दिवशी पाऊस अपेक्षित आहे.
मघा नक्षत्र : वाहन म्हैस
मघा नक्षत्र १६ आॅगस्ट रविवारी रात्री ७ वाजून ११ मिनिटांनी सुरू होते. वाहन म्हैस असून या नक्षत्रातील पाऊस दिलासा देणारा असेल. काही प्रदेशात अतिवृष्टीची शक्यता राहील. दि. १७ ते २१,२७,२८,२९ आॅगस्ट पाऊस अपेक्षित आहे .
पूर्वा नक्षत्र : वाहन बेडूक
३०आॅगस्ट रविवारी दुपारी ३ वाजून ६ मिनिटांनी सूर्य पूर्वा नक्षत्रात प्रवेश करतो. वाहन बेडूक आहे. रवी, बुध, शुक्र,शनी जल नाडीत आहेत. सुरुवातीला पाऊस चांगला, पण नंतर कमी पण सर्वदूर होईल. दि. ३०, ३१आॅगस्ट तसेच १ ते ३ ,९ ते ११ सप्टेंबरला पाऊस अपेक्षित आहे . दि.१३ सप्टेंबर रविवारी सकाळी ९वाजून २ मि. सूर्याचे उत्तरा नक्षत्र सुरू होते. वाहन मोर असून वायू मंडल योग आहे. या नक्षत्राचा पाऊस विखुरला जाऊन काही ठिकाणी चांगली वृष्टी तर काही ठिकाणी वारा सुटून पाऊस निघून जाईल. दि.१३ ते १७,२५ व २६ सप्टेंबर पाऊस अपेक्षित आहे .

Web Title: According to the calendar, heavy rains in the future

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.