विद्यार्थ्यांसाठी ‘झीरो बॅलन्स’वर खात्याची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:12 AM2021-07-04T04:12:18+5:302021-07-04T04:12:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासनाने उन्हाळी सुटीतील शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वितरित न करता त्याऐवजी आहाराचे ...

Account facility at zero balance for students | विद्यार्थ्यांसाठी ‘झीरो बॅलन्स’वर खात्याची सुविधा

विद्यार्थ्यांसाठी ‘झीरो बॅलन्स’वर खात्याची सुविधा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शासनाने उन्हाळी सुटीतील शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वितरित न करता त्याऐवजी आहाराचे अनुदान थेट लाभ हस्तांतरणद्वारे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याचा निर्णय घेतला आहे; पण दीडशे रुपयाच्या निधीसाठी एक हजार रुपयांचे बँक खाते काढावे लागणार आहे. परिणामी, हे पालकांना परवडणारे नाही. त्यामुळे हा निर्णय रद्द व्हावा, अशी मागणी पालकांकडून होत होती. अखेर जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने विद्यार्थ्यांचे खाते ‘झीरो बॅलन्स’वर काढण्याची तयारी दर्शविली आहे. तसे पत्र जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आले आहे.

शालेय पोषण आहाराच्या ‘दीडशे रुपयांच्या अनुदानासाठी काढावे लागणार हजारांचे खाते’ हे वृत शनिवारी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच, जिल्हा बँकेने याची दखल घेत शालेय विद्यार्थ्यांचे खाते ‘झीरो बॅलन्स’वर उघडण्याची तयारी दर्शविली आहे. याबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर यांनी पत्र पाठवून जिल्हा बँकेत खाते उघडण्याच्या सूचना देऊन तसे आदेश पारित करावे, अशी मागणी केली आहे.

काय आहे पत्रात...

जिल्हा बँकेच्या जिल्ह्यात एकूण २३८ शाखा असून बहुतेक शाखा ग्रामीण भागात आहेत. यापूर्वी बँकेत शाळेच्या विद्यार्थ्यांची बरीचशी खाती उघडण्यात आली आहेत. बँकेचे केंद्र शासनाच्या पीएम किसान सन्मान योजनेंतर्गत दोन लाख पंचवीस हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांची खाती असून लाभार्थ्यांच्या खात्यावर डीबीटीद्वारे रक्कमा जमा होतात. ग्रामीण भागात सुद्धा सर्व सुविधा पुरविण्यात येतात. त्यामुळे शालेय पोषण आहार योजनेंतर्गत जिल्ह्यातील जिल्हा परिषद सर्व शाळांतील विद्यार्थ्यांची झीरो बॅलन्सवर खाते उघडण्यास बँकेने तयारी दर्शविली आहे. त्यामुळे शालेय पोषण आहाराचे सर्व खाते बँकेत उघडण्यासंदर्भात आदेश पारित करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर यांनी केली आहे.

असे मांडले होते ‘लोकमत’ने मुद्दे

-शालेय पोषण आहाराकरिता धान्यासाठी अनुज्ञेय असलेल्या दराप्रमाणे सुटीतील ३५ दिवसांचे अनुदान इयत्ता पहिली ते पाचवी करिता १५६ रुपये, तर इयत्ता सहावी ते आठवीकरिता २३४ रुपये अनुज्ञेय ठरणार आहे. त्यामुळे दीड रुपयांच्या निधीकरिता एक हजार रुपयांचे बँक खाते परवडणारे नाही, अशी ओरड पालकांकडून होऊ लागली आहे.

- शिवाय बचत खात्यावर नियमित व्यवहार होत नसल्यास बँकेकडून दंड आकारला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे बचत खाते हे त्रासदायक होते. तेवढेच नुकसानकारकसुद्धा आहे.

तालुकानिहाय लाभार्थी संख्या

अमळनेर - २९१०९

भडगाव - १८४९९

भुसावळ - ३०७८८

बोदवड - १०३५८

चाळीसगाव - ५११७६

चोपडा - ३४१९७

धरणगाव - १८३९५

एरंडोल - १९१०५

जळगाव - ६२४०७

जामनेर - ४२५५१

मुक्ताईनगर - १८४८८

पाचोरा - ३४१९४

पारोळा - २२७५०

रावेर - ३१७२४

यावल - २७८०२

Web Title: Account facility at zero balance for students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.