भुसावळ येथे महापुरुषाबद्दल अपशब्दाची पोस्ट शेअर केल्याप्रकरणी आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 10:47 PM2018-12-10T22:47:19+5:302018-12-10T22:52:01+5:30

व्हॉट्सअपवर महापुरुषाबद्दल अपशब्द वापरणारी पोस्ट शेअर केल्याने शहर पोलीस ठाण्यात सोमवारी आरोपी तीलक मट्टू याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे, तर त्याच्या घराची जाळपोळ करणाºया १७ संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The accused arrested for sharing an abusive post about a great man at Bhusawal | भुसावळ येथे महापुरुषाबद्दल अपशब्दाची पोस्ट शेअर केल्याप्रकरणी आरोपीस अटक

भुसावळ येथे महापुरुषाबद्दल अपशब्दाची पोस्ट शेअर केल्याप्रकरणी आरोपीस अटक

Next
ठळक मुद्देघराची जाळपोळ करणाऱ्या १८ जणांविरुध्द गुन्हे दाखलगुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी पोलीस ठाण्यासमोर दुसºया दिवशी ठिय्याठिय्या आंदोलनामुळे परिसरात तणाव

भुसावळ, जि.जळगाव : व्हॉट्सअपवर महापुरुषाबद्दल अपशब्द वापरणारी पोस्ट शेअर केल्याने शहर पोलीस ठाण्यात सोमवारी आरोपी तीलक मट्टू याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे, तर त्याच्या घराची जाळपोळ करणाºया १७ संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील आरोपींची नावे वगळण्यात यावी या मागणीसाठी जमावाने दुसºाा दिवशीही शहर पोलीस ठाण्यासमोर तब्बल दिड तास ठिय्या मांडला होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता प्पर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी भेट देवून डीवायएसपी गजानन राठोड यांच्यासह अधिकाºयांशी चर्चा केली. या प्रकरणातील संशयित बाळा मोरे यांनी जमावाची समजूत काढली, त्यानंतर जमाव पांगला. दरम्यान, यामुळे शहरात तणावाचे वातावरण होते.
संशयित आरोपी तिलक देवीदास मट्टू (रा. मच्छी मार्वेष्ठट, वाल्मीकनगर) याने आदर्श बाळू तायडे यांच्यासोबत फोनवर महापुरुषाचे नाव घेऊन अपशब्द वापरला व शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याची धमकी देवून पिस्तुल रोखले. याप्रकरणी रेखाबाई विजय खरात (वय ४२, समतानगर) यांनी फिर्याद दिली. त्यावरुन तिलक छोटू मट्टू याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला १० रोजी सकाळी ७ वाजता सावदा, ता. रावेर येथून अटक करण्यात आली आहे.
तर दुसरीकडे संशयित तिलक मट्टू याच्या घराची जमावाने ९ रोजी रात्री तोडफोड करुन जाळून टाकल्याची घटना घडली. यावेळी आरोपींनी फिर्यादी देवीदास उर्पष्ठ छोटू रंजू मट्टू (वय ४५) यांच्यासह पत्नी मंजुलिका मुलगा आकाश, नात जान्हवी, सून माधवी यांना लाथाबुक्क्यांनी, लाकडी दांड्याने मारहाण केली. तसेच घराला आग लावून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यात फिर्यादीच्या डोक्याला दुखापत झाली. याबाबत सीआर १११/१८, भांदवि ३०७, ४५२, ४३६, १४३, १४७, १४८, १४९, ४२७, ५०४, ५०६ प्रमाणे संशयित आरोपी गणेश सपकाळे, रेखा खरात, बाळा उर्पष्ठ विजय पवार, बाळू तायडे, साहिल तायडे, विशाल सपकाळे, वंदना सोनवणे, विशाल अवसरमल, आकाश ढिवरे, योगेश तायडे, विक्रांत गायघोले, नरेंद्र उर्पष्ठ बाळा मोरे, समाधान उर्पष्ठ ओया निकम, शुभम सोयंके, संदीप सपकाळे यांच्यासह ४० ते ५० जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परस्परविरोधी दोन्ही गुन्ह्यांचा तपास डीवायएसपी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवीदास पवार, पीएसआय के.टी.सुरळकर करीत आहेत.
दरम्यान, घराची जाळपोळ व नुकसान केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपींची नावे गुन्ह्यातून वगळण्यात यावी या मागणीसाठी शहर पोलीस ठाण्यासमोर सोमवार १० रोजी दुपारी ३.३० वाजता जमावाने रस्त्यावर ठिय्या मांडला. याप्रसंगी रिपाईचे रमेश मकासरे, सुदाम सोनवणे, गटनेते उल्हास पगारे, नगरसेवक रवींद्र खरात, रवींद्र निकम, अनिल इंगळे यांनी, आरोपींची नावे वगळण्यात यावी याबाबत डीवायएसपी गजानन राठोड, पोलीस निरीक्षक देवीदास पवार यांच्याशी चर्चा केली. यावेळी डीवायएसपी राठोड यांनी घटनेची निपक्ष:पणे चौकशी करण्यात येवून दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.
या चर्चेनंतरही जमावाचे समाधान न झाल्याने अखेरीस श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानातून मोर्चा काढत रस्त्यावर परत ठिय्या मांडला. यानंतर समाजातील उपस्थित प्रमुखांनी जमावाची समजूत काढली. मात्र, जमावाचे त्यानेही समाधान न झाल्याने अखेरीस संशयित आरोपी बाळा मोरे याने जमावाची समजूत काढून जमावास घरी परत जाण्याचे आवाहन केले.
दरम्यान, घटनेचे गांभीर्य पाहता अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी शहर पोलीस ठाण्यास भेट देवून अधिकाºयांकडून घटनेबाबत माहिती घेऊन योग्य त्या सूचना दिल्या. यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरात ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे.

 

Web Title: The accused arrested for sharing an abusive post about a great man at Bhusawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.