भुसावळ लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यातून आरोपीचे पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:21 AM2021-08-14T04:21:18+5:302021-08-14T04:21:18+5:30
याबाबत सविस्तर वृत्त असे की , भुसावळ लोहमार्ग पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यातील आरोपी बबलू दिनकर महाले (३०, रा. ...
याबाबत सविस्तर वृत्त असे की , भुसावळ लोहमार्ग पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यातील आरोपी बबलू दिनकर महाले (३०, रा. बुलडाणा) हा आरोपी मुंबई येथे असल्याच्या माहितीच्या आधारे भुसावळ लोहमार्ग पोलीस स्थानकाचे कर्मचारी दिवानसिंग राजपूत, सतीश जोंजाड, प्रकाश डोंगरदिवे यांनी आरोपीस मुंबई येथे जाऊन ताब्यात घेतले. ते दिनांक १२ गुरुवार रोजी सेवाग्राम एक्सप्रेसने आरोपीस शेवटच्या विकलांग डब्यातून भुसावळकडे घेऊन येताना आरोपी पोलिसांच्या ताब्यातून नाशिक रेल्वे स्थानक येण्याआधी लहावित रेल्वे स्थानक येथे उडी मारून पळून गेला. या आरोपीविरुद्ध नाशिक लोहमार्ग पोलीस स्टेशनमध्ये दिवानसिंग राजपूत यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आधीही एक आरोपी झाला होता पसार
भुसावळ रेल्वे सुरक्षा बल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रेल्वेत चोरी करीत असताना हुसेन शेख इब्राहिम शेख (मालदा) यास १ ऑगस्ट रविवारी रोजी दुपारी पकडले. नंतर त्याला लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. त्याच दिवशी सायंकाळी हा आरोपी लोहमार्ग पोलिसांची नजर चुकवत पसार झाल्याची घटना घडली होती. दीड तासानंतर त्यास पुन्हा ताब्यात घेण्यात आले. यात पोलिसांना बरीच कसरत करावी लागली होती.
दरम्यान गुरुवारच्या घटनेबाबत भुसावळ लोहमार्गाचे पोलीस निरीक्षक सुरेश सरडे यांना विचारणा केली असता काही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.
बबलू महाले