खून प्रकरणातील आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 02:06 PM2019-04-14T14:06:50+5:302019-04-14T14:07:35+5:30

चोपडा तालुक्यातील निमगव्हाण येथे पैशांवरुन झाला होता वाद

The accused in the murder case arrested | खून प्रकरणातील आरोपीस अटक

खून प्रकरणातील आरोपीस अटक

Next


चोपडा : निमगव्हाण येथे ऊसतोड करण्यासाठी आलेल्या कामगारांमध्ये पैशांच्या देवाण घेवाणीतून झालेल्या मारहाणीत जखमी झालेल्या रामा जतेला भिलाला (रा. बनहूर, ता. भगवानपूर, मध्य प्रदेश) याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. दरम्यान मारहाण करणारा फरार आरोपी दुरसिंग सुभान भिलाला यास मध्यप्रदेशात जाऊन पोलिसांनी अटक केली.
जानेवारी मध्ये निमगव्हान येथे ऊसतोडणीसाठी रामा जतेला भिलाला यास दुरसिंग सुभान भिलाला याने सहा हजार रुपये दिले होते. ते परत घेण्यावरून झालेल्या वादात दुरसिंग याने रामा भिलाला याला मारहाण केली. यात जखमी रामा भिलाला उपचारासाठी जुलवानीया येथे दाखल केले होते. तेथे उपचारादरम्यान रामा याचा ३० जानेवारी १९ रोजी मृत्यू झाला. याबाबत कागदपत्रे ५ मार्च रोजी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्यावरुन गुन्हा दाखल झाला होता.
याबाबत सहायक पोलिस अधीक्षक सौरव अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भिमराव नंदूरकर यांच्या नेतृत्वाखाली हवालदार भरत नाईक, पो.कॉ विष्णू भिल यांच्या पथकाने दुर्गम भागात कुंभारबर्डी ता. भगवानपुरा जिल्हा खरगोन येथून आरोपी दुरसिंग सुभान भिलाला याच्या मुसक्या आवळल्या. आरोपीस चोपडा न्यायालयासमोर हजर केले असता त्यास दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली.

Web Title: The accused in the murder case arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.