दरोडा घालण्याच्या तयारीतील आरोपींच्या मुसक्या आवळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:12 AM2021-06-29T04:12:09+5:302021-06-29T04:12:09+5:30
अधिक माहिती अशी की , फिर्यादी पो.कॉ. विनोद नारायण डोळे बाजारपेठ पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या फिर्यादेनुसार २६ ...
अधिक माहिती अशी की , फिर्यादी पो.कॉ. विनोद नारायण डोळे बाजारपेठ पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या फिर्यादेनुसार २६ रोजी रात्री ३.३० ते ४.५० वाजेच्या दरम्यान भुसावळ शहरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा रोडवर नाहाटा चौफुली उड्डाण पुलाजवळ वरणगाव रोडवर घातक शस्त्रे जवळ ठेवून अंधाराचा फायदा घेऊन दरोडा घालण्याच्या उद्देशाने रोडवर मालट्रकसारखे चारचाकी वाहन थांबविण्याचा प्रयत्न काही जण करत होते. याच दरम्यान पेट्रोलिंगचे वाहन तेथून जात होते. आरोपी कुणाल भरत तिवारी (२६) तापीनगर के.नारखेडे शाळाजवळ, अक्षय श्यामकांत कुलकर्णी (२३) लक्ष्मी नारायण नगर ३२ खोली रॉकेल डेपो, आवेश शेख बिस्मिल्ला (२०) जिया कॉलनी, मुज्जीमल शेख कलिम (१९) विवेकानंद शाळेमागे तसेच एक अल्पवयीन असे वाहनांवर दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याचे लक्षात आले. त्यांना तत्काळ ताब्यात घेण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप भागवत तसेच प्रभारी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनानुसार या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई बंटी कापडणे,योगेश माळी नेवेल बाटली अशांनी मिळून केली. गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि मंगेश गोंटला व गजनान वाघ करीत आहे.
कॅप्शन :-राष्ट्रीय महामार्गावर दरोडा टाकणाऱ्या चार आरोपींना बाजारपेठ पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी न्यायालयात घेऊन जात असताना. २९/५