बिलवाडीतील पीडितेच्या आईला आरोपींकडून धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:19 AM2021-07-07T04:19:58+5:302021-07-07T04:19:58+5:30
ॲट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी बिलवाडीतील पिडीतेच्या आईला आरोपींकडुन धमकी अट्रासीटी दाखल करण्याची मागणी बिलवाडीतील पिडीतेच्या आईला संशयीत आरोपींकडुन धमकी ...
ॲट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी
बिलवाडीतील पिडीतेच्या आईला आरोपींकडुन धमकी
अट्रासीटी दाखल करण्याची मागणी
बिलवाडीतील पिडीतेच्या आईला संशयीत आरोपींकडुन धमकी
लोकमत न्यूज नेटवर्क
जामनेर : बिलवाडी (ता. जामनेर) येथील मतिमंद अल्पवयीन मुलीवर अत्याचार संशयितांकडून गुन्हा मागे घेण्यासाठी पीडितेच्या आईला गावात राहू न देण्याची धमकी व जातिवाचक शिवीगाळ केली जात आहे. संशयित आरोपींविरूध्द अनुसूचित जाती जमाती कायद्यान्वये ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी संत शिरोमणी गुरु रविदास संस्थेने पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
पीडितेच्या आईने समाजबांधवांसोबत सोमवारी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन दिले. गुन्ह्यातील अज्ञान बालक संशयितांची जामीनावर मुक्तता झाली असून, त्यांनी घरी येऊन जातिवाचक शिवीगाळ केली व गुन्हा मागे न घेतल्यास गावात राहू देणार नाही, अशी धमकी दिल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
कारवाई न झाल्यास समाजबांधव आंदोलन करतील, तसेच मोर्चा काढतील, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर मनोहर जोनवाल, शैलेंद्र लोडते, भारत रिछवाल, खंडू पवार, मनोज सोनवणे, विनोद गायकवाड, गणेश लोडते यांच्या सह्या आहेत.