भोकरी येथील अल्पवयीन मुलीस पळवून नेणारा आरोपी अखेर गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 05:04 PM2018-10-27T17:04:03+5:302018-10-27T17:05:07+5:30

भोकरी येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीस वडिलांचा सहकारी म्हणून सात-आठ दिवस मुक्कामास राहिलेल्या उत्तर प्रदेशातील २५ वर्षीय युवकाने पळवून नेले असता रावेर पोलिसांच्या पथकाने पीडित अल्पवयीन मुलीसह त्यास पनवेल येथून ताब्यात घेऊन गजाआड केले आहे.

 The accused who abducted a minor girl in Bhokari, finally went missing | भोकरी येथील अल्पवयीन मुलीस पळवून नेणारा आरोपी अखेर गजाआड

भोकरी येथील अल्पवयीन मुलीस पळवून नेणारा आरोपी अखेर गजाआड

Next
ठळक मुद्देउत्तर प्रदेशातील तरुणास पीडितेसह पनवेलहून केले जेरबंदबालकांवरील अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील व बलात्काराच्या कलमांची गुन्ह्यात वाढआरोपीची जळगाव कारागृहात रवानगी

रावेर, जि.जळगाव : तालुक्यातील भोकरी येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीस वडिलांचा सहकारी म्हणून सात-आठ दिवस मुक्कामास राहिलेल्या उत्तर प्रदेशातील २५ वर्षीय युवकाने पळवून नेले असता रावेर पोलिसांच्या पथकाने पीडित अल्पवयीन मुलीसह त्यास पनवेल येथून ताब्यात घेऊन गजाआड केले आहे. तपासाअंती पीडित मुलगी ही अल्पवयीन असल्याने सदर आरोपीविरुद्ध बलात्कार व बालकांवरील अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील कलमांची वाढ करण्यात आली असून, आरोपीस न्यायालयात उभे केले असता सहदिवाणी न्या.आर. एल.राठोड यांनी न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याची जळगाव उपकारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
भोकरी येथे वडिलांचा सहकारी म्हणून घरी मुक्कामास आलेल्या उत्तर प्रदेशातील मोहंम्मद इमरान मोहंम्मद हसन (वय २५) रा.धर्मेइ अलावर दिवारिया, जि.गोंड याने सात-आठ दिवसांच्या मुक्कामानंतर पळवून नेल्याची घटना घडली होती. पीडित मुलीच्या बापाने दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, रावेर पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार मनोहर जाधव, पो.ना.हरिलाल पाटील, पो.कॉ.जाकीर पिंजारी, पो.कॉ.सुरेश मेढे व नीलेश चौधरी यांच्या पथकाने तपासाची चक्र फिरवून उभय आरोपीस पीडितेसह पनवेल येथून ताब्यात घेतले होते. सदरची पीडित मुलगी ही १४ वर्षे २ महिन्याची असल्याने व तिच्यावर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाल्याने दाखल गुन्ह्यात भादंवि कलम ३७६ व बालकांवरील अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील अधिनियम ५, ११, १२ या कलमांची वाढ करून आरोपीस २२ आॅक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. रावेर न्यायालयात त्यास हजर केले असता, त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली होती. त्यास पुन्हा शुक्रवारी रावेर न्यायालयात न्या.आर.एल.राठोड यांच्या न्यायासनासमोर उभे केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्या अनुषंगाने उभय आरोपीची जळगाव उपकारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली फौजदार मनोहर जाधव करीत आहेत.




 

Web Title:  The accused who abducted a minor girl in Bhokari, finally went missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.