फिर्यादीने पकडून आणलेल्या आरोपीने धावत्या दुचाकीवरुन मारली उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 10:55 PM2017-09-24T22:55:25+5:302017-09-24T22:57:26+5:30
पोलिसांना आरोपी सापडत नसल्याने फिर्यादीनेच शिरपूर येथून आरोपी जितेंद्र रामदास पाटील (वय ३२ रा.वराडसीम, ता.भुसावळ) यासपकडून दुचाकीने जामनेर येथे घेवून जात असताना जितेंद्रयानेमहामार्गावरउभ्याअसलेल्यापोलिसांना पाहून धावत्या दुचाकीवरुन उडी मारुन निसटण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार महामार्गावरील कालिंका माता मंदिराजवळ रविवारी सकाळी अकरा वाजता घडला.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,२४ : पोलिसांना आरोपी सापडत नसल्याने फिर्यादीनेच शिरपूर येथून आरोपी जितेंद्र रामदास पाटील (वय ३२ रा.वराडसीम, ता.भुसावळ) यासपकडून दुचाकीने जामनेर येथे घेवून जात असताना जितेंद्रयानेमहामार्गावरउभ्याअसलेल्यापोलिसांना पाहून धावत्या दुचाकीवरुन उडी मारुन निसटण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार महामार्गावरील कालिंका माता मंदिराजवळ रविवारी सकाळी अकरा वाजता घडला.
काय आहे प्रकरण?
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जितेंद्र पाटील याने जामनेर येथील केशरीलाल प्रभाकर जैन व दीपक नेमानाथ चतूर या दोघांकडून रेल्वेत नोकरीला लावून देण्यासाठी आठ लाख रुपये घेतले. खोटे आश्वासने देत गेल्याने या तरुणांना नोकरी लागली नाही व त्यांचे पैसेही परत केले नाहीत म्हणून जामनेर पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.
एकाच दुचाकीवर चार जण
एकाच दुचाकीवर जितेंद्रसह चार जण जामनेर येथे जात होते. आपण पोलिसांच्या तावडीत जावू किंवा आपल्याला या लोकांकडून मारहाण होईल या भीतीने जितेंद्र याने कालिंका माता मंदिराजवळ ड्युटीला असलेल्या वाहतूक पोलिसांना पाहून धावत्या दुचाकीवरुन उडी मारली. पळून जाण्याच्या तयारीत असताना जैन व सहकाºयांनी त्याला पकडले. वाहतूक पोलीस मनोज बाविस्कर, सतीश पाटील व गहीनाथ बोडके यांनी त्यांची चौकशी केली असता हे तिन्ही जण मला मारहाण करीत असल्याचे जितेंद्रने सांगितले. तर जैन यांनी आठ लाख रुपयाच्या फसवणुकीच्या गुन्'ातील जितेंद्र हा आरोपी असून आम्हीच त्याला पकडून आणल्याचे सांगितले.