अ‍ॅसिडने भरलेला टॅँकर पेटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 01:07 PM2019-05-29T13:07:06+5:302019-05-29T13:07:33+5:30

तासभर वाहतूक खोळंबली

Acid filled with tanker blazes | अ‍ॅसिडने भरलेला टॅँकर पेटला

अ‍ॅसिडने भरलेला टॅँकर पेटला

googlenewsNext

जळगाव : मुंबईहून अ‍ॅडीस भरून नागपूरकडे जाणारा टँकर समोरून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकला वाचविताना महामार्गाच्या खाली उलटून त्याने पेट घेतल्याचा थरारक प्रकार खोटेनगरजवळ रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडला़ आगीचे प्रचंड लोळ, धूर व दुर्गंधीमुळे प्रचंड भितीचे वातावरण या परिसरात निर्माण झाले होते. चालक या घटनेत बचावला असून तासाभराने आग आटोक्यात आणून महामार्ग मोकळा करण्यास पोलीस यंत्रणेला यश आले़
मुंबई येथील राम रतन यादव यांच्या मालकीचा (एम़ एच़ ०४ जी़ आऱ ११९२) या टँकरमध्ये मुंबई येथून २५ टन नायट्रीक अ‍ॅसीड भरून हा टँकर चालक बीरजु यादव (मूळ रा़ उत्तर प्रदेश, ह़मु मुंबई) हा घेऊन नागपूर येथे निघाला होता़ पाळधीकडून येत असताना खोटेनगरजवळ हॉटेल राधीकाच्या जवळ समोरून भरधाव वेगात येणारा ट्रक थेट टँकवर आला़ या ट्रकला वाचविताना बीरजु याने टँकरचे स्टिअरींग अगदी वेगाने डाव्या बाजुला वळविले़ यात महामार्गाच्या खाली असलेल्या मोठ्या खड्डयात हा टँकर उलटला़ टँकर उलटताच यातील अ‍ॅसीड व पेट्रोलने क्षणात पेट घेतला़ आगीने क्षणात रौद्र रूप धारण केले होते़ आगीचे प्रचंड लोळ आकाशाकडे झेपावत होते. यात टँकरचे टायर जळाल्याने तसेच अ‍ॅसीडमुळे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी व धूर पसरला होता़ दुर्गंधी इतकी प्रचंड होती की टँकरजवळ जाणेही कठीण होत होते़ नागरिकांना थांबताही येत नव्हते़ अखेर काही वेळाने तीन अग्निशमन बंबानी घटनास्थळी येऊन ही आग विझविली़
तो वाचला इतरांनाही वाचविले
बीरजुु यादव हा टँकर घेऊन महामार्गावरून जात असताना अचानक एक ट्रक भरधाव वेगात त्याच्या समोर आला़ यावेळी त्याने प्रसंगावधान राखत टँंकरचा स्टेरींग डाव्या बाजुने जोरात वळविला़ यात टँकर डाव्या बाजुला खड्डयात उलटला़ त्याने तत्काळ टँकरमधून उडी घेतली़ चुकुन हा टँकर उजव्या बाजुला गेला असता तर महामार्गावर मोठी हानी झाली असती़ बीरजू या टँकरमध्ये एकटाच होता़
महामार्ग तासभर ठप्प
अपघात झाल्यामुळे शहरात गुजराल पेट्रोलपंपापर्यंत तर दुसºया बाजुने बांभोरीपर्यंत पूर्ण वाहतूक तासाभरासाठी ठप्प होती़ तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, रामानंद पोलीस निरीक्षक बुधवंत, वाहतूक शाखेचे देविदास कुनगर यांच्यासह ४० ते ५० पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती़ तासाभराच्या परिश्रमानंतर रात्री १० .३५ वाजता वाहतूक सुरळीत करण्यात पोलीस यंत्रणेला यश आले होते़ बीर्जु यादव या घटनेत बचावला आहे़

Web Title: Acid filled with tanker blazes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव