पहूर, लोंढ्रीत भूमिपुत्रांचे श्रमदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 07:26 PM2019-04-25T19:26:44+5:302019-04-25T19:26:48+5:30
काहीतरी वेगळे : जलयोद्ध्यांकडून पाणी फाउंडेशन कामासाठी उत्साहाने सुरुवात
पहूर, ता.जामनेर : नोकरीनिमित्ताने बाहेरगावी अधिकारी असलेले पहूर गावाचे भूमिपुत्र जिल्हा मुद्रांक अधिकारी दीपक पंढरीनाथ पाटील व लोंढ्री गावातील अधिकारी भूमिपुत्रांनी ग्रामस्थांसोबत दिवसभर श्रमदान केले. गाव पाणीदार करण्यासाठी सर्वच सरसावले आहे. यामुळे तुफान आलं या अशी प्रचिती येत आहे.
पहूरचे भूमिपुत्र दीपक पंढरीनाथ पाटील हे ठाणे येथे जिल्हा मुद्रांक अधिकारी म्हणून आहेत. पाणी फाउंडेशनमध्ये पहूरपेठची निवड झाली आहे. यासाठी दीपक पाटील व त्यांच्या पत्नी शुभांगी पाटील यांनी सोमवारी सकाळी बेरमळी नाल्यात श्रमदान केले आहे.
याठिकाणी सेवानिवृत्त राज्य माहिती आयुक्त व्ही.डी.पाटील यांनी जलयोद्ध्यांना मार्गदर्शन केले.
यात सरपंच नीता पाटील, रामेश्वर पाटील, जि. प. माजी. सदस्य राजधर पांढरे, अलोक महाराज, भास्कर पाटील, बाल विकास प्रकल्प अधिकारी ईश्वर गोयर, दौलत घोलप, बाबूराव पांढरे, साहेबराव देशमुख, शैलेश पाटील, अशोक पाटील, अॅड. एस. आर.पाटील, संतोष चिंचोले, उत्तम क्षीरसागर, सुषमा चव्हाण, भाऊराव गोंधनखेडे, गणेश पांढरे, बापू सोनार, गयासुद्दीन तडवी, शेखचाँद तडवी, ईश्वर देशमुख, संदीप बेढे, भारत पाटील, शांताराम गोंधनखेडे, पाणी फाउंडेशन टीम यांचा सहभाग होता.
यापूर्वी केवडेश्वर नाल्यावर श्रमदानातून चार मातीचे बांध घालण्यात आले असून जुन्या शेवडीचे काम हातात घेण्यात आले असल्याचे रामेश्वर पाटील यांनी सांगितले आहे. दीपक पाटील यांच्याकडून टिक्कम, फावडे, टोपल्या व पन्नास तास कामासाठी लागणारे जेसीबी मशीनचे भाडे देण्यात आले आहे.