रस्त्यासाठी व्यापारी आंदोलनाच्या पवित्र्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 10:51 PM2019-12-09T22:51:09+5:302019-12-09T22:51:32+5:30
पाचोरा : शहरातील जामनेर रोडची दुरवस्था झाली असून त्यावरील खड्डे बुजवण्यात यावेत. तसेच हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा. अन्याथा ...
पाचोरा : शहरातील जामनेर रोडची दुरवस्था झाली असून त्यावरील खड्डे बुजवण्यात यावेत. तसेच हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा. अन्याथा आंदोलन केले जाईल, असा इशारा व्यापाऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
शहरातील जामनेररोड हा मुख्य बाजारपेठेचा रस्ता असून गेल्या तीन वर्षापासून या रस्त्यावर अगणित खड्डे झाले आहेत. त्यामुळे नियमितपणे किरकेळ अपघात होत आहेत. रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानदारांना रोज धुळीचा सामना करावा लागत आहे. याबाबत नगरपालिकेला वारंवार सूचना देऊन देखील गांभीर्याने विचार केला जात नाही. त्यामुळे येथील व्यापारी वर्गाने मुख्याधिकारी सोमनाथ आढाव यांना निवेदन दिले आहे. सदर निवेदनात रस्त्याचे काम तात्काळ करावे अन्यथा सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन सोमवंशी यांच्यासह व्यापारी विराज माथुरवैश्य, सुमित शर्मा, दिपक देसाई, कमलेश देसाई, प्रशांत ठाकूर, किशोर पाटील, कमलेश सुराना, सिताराम सावकारे, आकाश माथुरवैश्य, सुनील सावंत, इम्रान देशमुख आदी उपस्थित होते.
मुख्याधिकारी आढाव यांनी लवकरच भुयारी गटारचे काम सुरू होईल. त्यानंतर तत्काळ रस्ता काँक्रिटीकरण करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच याबाबत आंदोलन न करण्याची विनंतीही व्यापारी वर्गास प्रशासनाच्या वतीने केली आहे.