एचआयव्हीग्रस्त रुग्णांना पूरक औषधी मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 12:53 PM2018-12-14T12:53:41+5:302018-12-14T12:54:03+5:30

रुग्णांची तक्रार

Acquired medicines for HIV-infected patients | एचआयव्हीग्रस्त रुग्णांना पूरक औषधी मिळेना

एचआयव्हीग्रस्त रुग्णांना पूरक औषधी मिळेना

googlenewsNext

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील एआरटी सेंटरमधून एडस् संसर्गितांना दिल्या जाणाऱ्या काही औषधीचा तुटवडा असल्याने ही औषधी मिळत नसल्याची रुग्णांची तक्रार आहे. या संदर्भात मात्र एआरटी सेंटरच्यावतीने इन्कार करण्यात आला असून आवश्यक ती सर्व औषधी रुग्णांना नियमित दिली जात असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यातील एच.आय.व्ही. संसर्गित रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील एआरटी सेंटरमध्ये औषधोपचार केले जातात. यामध्ये काही रुग्णांना झिडोकडाईन लॅमकोडाईन अर्थात झेड.एल., टीएलई व इथर पूरक औषधी दिली जाते. एकदा औषधी सुरू झाली की ती शेवटपर्यंत कायम व विनाखंडित द्यावी लागते. अन्यथा विषाणूंची संख्या वाढत जाते व रुग्णांचा जीव धोक्यात येतो. असे असले तरी काही पूरक औषधीचा तुटवडा भासून ती मिळत नसल्याचे काही रुग्णांनी सांगितले. तसेच बाहेर ही औषधी महाग येते. ती घेण्याची अनेकांची आर्थिक स्थिती नसलते. त्यामुळे या सेंटरमधून नियमित औषधी मिळावी, अशी रुग्णांची मागणी आहे.
या बाबत एआरटी सेंटरकडून इन्कार करण्यात येऊन सांगण्यात आले की, एआरटी सेंटरमधून रुग्णांना नियमित औषधी दिली जात आहे. काही पूरक औषधी असती ती रुग्णांची संख्या पाहून उपलब्ध करून दिली जाते. औषधी दिली जात नाही, असे होत नाही, असेही या सेंटरच्यावतीने सांगण्यात आले. जळगावातील सेंटरवर ही पूरक औषधी नसल्यास ती नाशिक अथवा इथर सेंटरवरून मागविली जाते. अशाच प्रकारे राज्यातील प्रत्येक सेंटरची स्थिती असल्याची माहिती मिळाली.
उपचार सुरू करा
जिल्ह्यामध्ये १४ हजार एच.आय.व्ही. रुग्णांची नोद आहे. यापैकी १० हजार उपचार घेणारे रुग्ण आहेत. उपचार सुरू न केलेल्या रुग्णांनीही एआरटी सेंटरशी संपर्क साधून उपचार सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केंद्राकडूनच औषधीचा पुरवठा कमी केंद्र सरकारकडून राज्याला व मुंबई येथून जिल्हा रुग्णालयाला या औषधींचा पुरवठा केला जातो. यामध्ये केंद्राकडूनच औषधीचा पुरवठा कमी प्रमाणात होत होता. त्यामुळे रुग्णांना एकसोबत पूरक औषधी न देता थोडी-थोडी दिली जात होती. मात्र ती नियमित सुरू होती, असे सेंटरच्यावतीने सांगण्यात आले.
आवश्यक सर्व औषधी उपलब्ध असून त्या सोबत दिली जाणारी पूरक औषधी मिळत नाही, असे कधीच होत नाही. रुग्णांच्या मागणीनुसार रुग्णांना पूरक औषधी उपलब्ध करून दिली जाते.
- संजय पहूरकर, कार्यक्रम अधिकारी, एआरटीसेंटर.

Web Title: Acquired medicines for HIV-infected patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.