जामनेर व मुक्ताईनगर तालुक्यात सात विहिरींचे अधिग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:14 AM2021-04-12T04:14:23+5:302021-04-12T04:14:23+5:30
जळगाव : वाढत्या उन्हासोबतच टंचाई वाढू लागली असून, यासाठी उपाययोजनांना वेग आला आहे. यामध्ये जामनेर तालुक्यात चार, तर मुक्ताईनगर ...
जळगाव : वाढत्या उन्हासोबतच टंचाई वाढू लागली असून, यासाठी उपाययोजनांना वेग आला आहे. यामध्ये जामनेर तालुक्यात चार, तर मुक्ताईनगर तालुक्यात तीन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. मात्र, तरीदेखील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता उपाययोजना केल्या जात आहेत. यात सर्वाधिक उपाययोजना अमळनेर व पारोळा तालुक्यांत प्रस्तावित आहेत, असे असले तरी टंचाई निवाराणासाठी जामनेर तालुक्यापासून सुरुवात झाली आहे. यात जामनेर तालुक्यात चार गावांसाठी चार विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे, तसेच मुक्ताईनगर तालुक्यातदेखील तीन गावांसाठी तीन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
विहीर अधिग्रहण सुरू झाले असले तरी अद्याप जिल्ह्यात कोठेही टँकर सुरू झालेले नाही, एवढे दिलासादायक चित्र एप्रिल महिन्यात तरी आहे.