एसीएस महाविद्यालयाला विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 01:15 AM2017-09-20T01:15:51+5:302017-09-20T01:18:02+5:30

ACS College wins volleyball title | एसीएस महाविद्यालयाला विजेतेपद

एसीएस महाविद्यालयाला विजेतेपद

Next
ठळक मुद्दे१७ वर्षे आतील गटात ११ संघ सहभागी झाले होतेमहात्मा फुले विद्यालयाच्या संघाने बुºहानी स्कूलवर २ -० असा विजय मिळवला. १४ वर्षे गटात विवेकानंद विद्यालय विजयी


लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा व्हॉलिबॉल संघटनेने आयोजित केलेल्या जिल्हास्तर व्हॉलिबॉल स्पर्धेत विवेकानंद विद्यालय, महात्मा फुले हायस्कूल आणि एसीएस महाविद्यालयाने विजेतेपद पटकावले आहे. 
उर्वरीत जिल्हास्तर व्हॉलिबॉल स्पर्धा मंगळवारी जिल्हा क्रीडा संकुलात पार पडली. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण महापालिका क्रीडा अधिकारी किरण जावळे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, ला.ना. विद्यालयाचे मुख्याध्यापक दुर्गादास मोरे, डॉ.प्रदीप तळवेलकर, राजेश जाधव, प्रा.देवदत्त पाटील, भैय्या देसले उपस्थित होते.  १४ वर्षे आतील गटाच्या अंतिम सामन्यात विवेकानंद विद्यालयाने सद्गुरू विद्यालयावर २ -१ असा विजय मिळवला. १७ वर्षे आतील गटात ११ संघ सहभागी झाले होते. त्यात अंतिम सामन्यात महात्मा फुले विद्यालयाच्या संघाने बुºहानी स्कूलवर २ -० असा विजय मिळवला.  निवड समिती सदस्य म्हणून कल्याणी वराडे, दिनेश पाटील, प्रा.देवदत्त पाटील यांनी काम पाहिले. १९ वर्षे आतील गटात ए.सी.एस कॉलेज धरणगावने महात्मा गांधी विद्यालय यावलवर २ -० असा विजय मिळवला. अंकित पाटील, हरीष नाईक, प्रसाद पाटील यांनी अष्टपैलु खेळ करत धरणगाव संघाला विजय मिळवून दिला. यशस्वितेसाठी  सुर्यकांत वराडे, नीलेश परदेशी यांनी परिश्रम घेतले.

Web Title: ACS College wins volleyball title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.