मेहरुण चौपाटीवर फिरणाऱ्या ९ जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 01:02 PM2020-07-19T13:02:46+5:302020-07-19T13:03:16+5:30
जळगाव : बंदी असतानाही मेहरुण तलावाच्या चौपाटीवर वाहने घेऊन फिरणाºया ९ जणांवर एमआयडीसी पोलिसांनी रविवारी सकाळी कारवाई केली. त्यांच्याकडून ...
जळगाव : बंदी असतानाही मेहरुण तलावाच्या चौपाटीवर वाहने घेऊन फिरणाºया ९ जणांवर एमआयडीसी पोलिसांनी रविवारी सकाळी कारवाई केली. त्यांच्याकडून जागेवरच ३ हजार ३०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, या भागात पोलीस गस्त वाढविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी मेहरुण तलाव चौपाटीवर वाहने नेण्यास व फिरण्यास मनाई केली होती. त्याशिवाय लॉकडाऊन काळात जिल्हाधिकाऱ्यांनीही बंदी आदेश काढले होते. वाहने येऊ नये म्हणून एमआयडीसी पोलिसांनी गेल्या आठवड्यात तलावाजवळ बॅरिकेटींग केले होते. तरीही काही नागरिक हे बॅरिकेटस् हटवून वाहने नेत असल्याचा प्रकार उघड झाला होता. रविवारी एमआयडीसी पोलिसांचे सोनसाखळी चोरी विरोधी पथक तलाव पसिरात गस्त घालत असताना त्यांना तलावाजवळ ९ वाहने फिरताना दिसून आली. या पोलिसांनी या सर्व वाहनांवर व चालकांवर कलम १८८ अन्वये कारवाई करुन ३ हजार ३०० रुपये दंड वसूल केला.