तळेगाव येथील खाजगी डॉक्टरांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 18:54 IST2021-04-14T18:52:52+5:302021-04-14T18:54:45+5:30
तळेगाव (ता. जामनेर) येथील खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्यावर वैद्यकीय पथकाने कारवाई केली.

तळेगाव येथील खाजगी डॉक्टरांवर कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
जामनेर : तळेगाव (ता. जामनेर) येथील खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्यावर बोगस डॉक्टर समितीचे अध्यक्ष, गटविकास अधिकारी जे.व्ही. कवळदेवी यांच्या अध्यक्षतेखाली वैद्यकीय पथकाने कारवाई केली.
पथकाने अचानक भेट दिली असता आढळून आलेल्या अनियमिततेबाबत त्यांना नोटीस बजावण्यात आली. प्रफुल्ल बोहरा व संतोष पाटील यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय व्यवसायाचे प्रमाणपत्र आढळून आले नाही. डॉ. स्वप्नील पाटील यांच्याकडे कोणतेही रेकॉर्ड, आवश्यक ते परवाने आढळून आले नाहीत, तसेच कोरोना चाचणी न करता केवळ टायफाइडची चाचणी करून अधिक प्रमाणात सलाइन लावत असल्याचे दिसून आले. संबंधितांवर कारवाई दाखल करण्याची प्रकिया पूर्ण करण्यात येईल, असे कवळदेवी यांनी सांगितले.
पथकात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी राऊत, डॉ. मनोज तेली, ग्रामविस्तार अधिकारी अशोक पालवे, मलेरिया पर्यवेक्षक व्ही.एच. माळी, आरोग्यसेवक एस.बी. सूर्यवंशी, आरोग्यसेविका दुर्गा जाधव, गीता माळी, रंजना कोळी यांचा समावेश होता.