दोन महिला कर्मचाºयांमध्ये हाणामारी
By admin | Published: July 6, 2017 12:46 AM2017-07-06T00:46:42+5:302017-07-06T00:46:42+5:30
गट साधन केंद्रातील प्रकार : जिल्हापेठ पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
लोकमत न्यूजनेटवर्क
जळगाव : शहरातील विद्यानिकेतन विद्यालयाजवळील गट साधन केंद्रात कार्यालयीन कामकाजावरून दोन महिला कर्मचाºयांमध्ये हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास झाली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्थानकात एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
गट साधन केंद्रात मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास डाटा आॅपरेटर व रोखपाल पदी कार्यरत असलेल्या महिलांमध्ये कार्यालयीन कामकाजावरून हाणामारी झाली असल्याची माहिती गट साधन केंद्रातील कर्मचाºयांनी दिली.
या प्रकरणी गट शिक्षण अधिकारी कल्पना चव्हाण यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघं कर्मचाºयांमध्ये शाब्दिक चकमक सुरुच असल्याने अन्य कर्मचाºयांनीदेखील मध्यस्थी हा वाद शांत करण्याचा प्रयत्न केला.
अंगावर खुर्ची मारण्याचा प्रयत्न
दोन्ही महिलांमध्ये वाद सुरु असताना, डाटा आॅपरेटर महिलेचा पती केंद्रात आल्याने हा वाद चांगलाच वाढला.
तसेच महिलेच्या पतीने रोखपाल महिलेच्या अंगावर खुर्ची मारण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती काही कर्मचाºयांनी दिली.
मात्र पंचायत समितीतील काही कर्मचाºयांनी गट साधन केंद्रात येवून हा वाद शांत केला. रोखपाल महिलेकडून महिला दक्षता समितीकडे याबाबत तक्रार केल्याने दक्षता समितीच्या महिला कर्मचारी व पोलीसांनी गट साधन केंद्रात येवून याबाबत चौकशी केली.
तसेच या ठिकाणी शिवसेनेच्या महिला पदाधिकारी देखील आल्या होत्या. तसेच या प्रकरणी एकमेकांविरोधात जिल्हापेठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.