कारवाई केलेली निमखेडी येथील ३०० ब्रास वाळू आणली प्रशासकीय इमारत परिसरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 11:39 AM2020-01-15T11:39:50+5:302020-01-15T11:40:16+5:30
जळगाव : महसूल व पोलीस प्रशासनाने सोमवारी वाळू चोरांविरूध्द केलेल्या संयुक्त कारवाईत पकडलेली वाळू मंगळवारी निमखेडी येथून महसूल विभागाने ...
जळगाव : महसूल व पोलीस प्रशासनाने सोमवारी वाळू चोरांविरूध्द केलेल्या संयुक्त कारवाईत पकडलेली वाळू मंगळवारी निमखेडी येथून महसूल विभागाने जप्त करून प्रशासकीय इमारत परिसरात आणली.
मंगळवार सकाळपासून जवळपास २५० ते ३०० ब्रास वाळू निमखेडी येथून प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली उचलून डंपरने आणण्यात आली.
वाळू गटांसाठी ४ प्रस्ताव
महिनाभरात वाळू गटांचा लिलाव करायचा असला तरी यंदा अद्याप केवळ रावेर तालुक्यातून चार प्रस्ताव आले आहे.
नवीन वाळू धोरणानुसार संबंधित ग्रामपंचायतीने वाळू गटाचा लिलाव करण्याबाबत ठराव करून तहसीलदारांना द्यावयाचा आहे. तहसीलदारांनी तो ठराव जिल्हास्तरीय समितीकडे पाठवायचा आहे. गेल्या तीन महिन्यात जिल्ह्यातील एकाही ग्रामपंचायतीने वाळू लिलाव करण्याबाबत ठराव केलेला नव्हता. रावेर तालुक्यातील चार ठिकाणच्या ग्रामपंचायतींनी वाळू गटाचे लिलाव करण्याबाबत प्रस्ताव पाठविले आहेत.