कुंटनखान्यावर धाड, चोपडा पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 03:43 PM2019-06-28T15:43:28+5:302019-06-28T15:45:05+5:30
१६ आंबटशौकिनांसह ३२ महिलांना घेतले ताब्यात
चोपडा : येथील शहराबाहेरील कुंटनखान्यावर सहायक पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या पथकाने २७ जून रोजी सायंकाळी ७ वाजता धाड टाकून १६ आंबटशौकिनांसह ३२ महिलांना ताब्यात घेतले आहे. यात त्यांच्या १५ दुचाकी व २ आॅटो रिक्षा जप्त केल्या आहेत. शहरात प्रथमच अशा प्रकारची मोठी कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईत सहायक पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, पोलीस निरीक्षक विनायक लोकरे, सहायक पोलीस निरीक्षक योगेश तांदळे, पोलीस उपनिरीक्षक यादव भदाणे, रामेश्वर तुरनार, अर्चना करपुडे, हवालदार जितेंद्र सोनवणे, असिफ मिर्झा, विद्या इंगळे, शुभांगी लांडगे, पोलीस नाईक नीलेश सोनवणे, जयदीप राजपूत, प्रदीप राजपूत, जितेंद्र चव्हाण, रवींद्र पाटील, श्याम पवार, प्रकाश मथुरे, नीलेश लोहार, रवींद्र पाटील, विजय बच्छाव, संगीता पवार यांनी संयुक्त कारवाई केली. पिटा कायद्यानुसार कारवाई करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.