कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत कृती समिती आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:17 AM2021-03-31T04:17:17+5:302021-03-31T04:17:17+5:30
आगार व्यवस्थापकांकडे तक्रार : तात्काळ तक्रारी सोडविण्याचे दिले आश्वासन लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : आगारातील कर्मचाऱ्यांच्या वाढत्या समस्यांबाबत मंगळवारी ...
आगार व्यवस्थापकांकडे तक्रार :
तात्काळ तक्रारी सोडविण्याचे दिले आश्वासन
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आगारातील कर्मचाऱ्यांच्या वाढत्या समस्यांबाबत मंगळवारी संयुक्त कृती समितीच्या सदस्यांनी आगार व्यवस्थापक नीलेश पाटील यांची भेट घेतली. यावेळी महिला व पुरुष वाहकांच्या विविध समस्या नीलेश पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तात्काळ कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन तक्रारी सोडविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी संयुक्त कृती समितीचे सदस्य आर. के .पाटील, गोपाळ पाटील, विनोद पाटील, मनोज सोनवणे, आर. आर .शिंदे, शैलेश नन्नवरे, प्रताप सोनवणे, गणेश पाटील, ललित गायकवाड, भालचंद्र हटकर, ज्योती चौधरी,, यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.
इन्फो :
कर्मचाऱ्यांच्या या मागण्या मान्य
- एसटी कर्मचाऱ्यांनी रजा व इतर कारणांबाबत केलेल्या अर्जावर वस्तुस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल.
- मास्क व सॅनिटायझर चा पुरवठा नियमितपणे सुरू राहील.
- महिला वाहकांना रात्रीचे कर्तव्य लावण्यात येणार नाही.
- उर्मट वर्तणुकीची संदर्भात तक्रार आल्यास चौकशी केली जाईल.
- रोटेशन प्रमाणे कर्तव्य लावण्यात येईल. कर्तव्य न मिळालेल्या कर्मचाऱ्यांना हजेरी भरून देण्यात येईल.
-स्पेअर रजिस्टर हे चालक वाहकांसाठी स्वतंत्र करून वाहन परीक्षक कार्यालय व कॅश/इशू सेक्शनला ठेवण्यात येईल.