कृती समिती धसास लावणार महामार्गाचा प्रश्न

By admin | Published: February 5, 2017 12:45 AM2017-02-05T00:45:40+5:302017-02-05T00:45:40+5:30

ेएक नागरिक मंचच्या सभेत निर्धार : लोकप्रतिनिधी व संवेदनाहीन प्रशासनावर सडकून टीका

The action committee will be proud of the highway | कृती समिती धसास लावणार महामार्गाचा प्रश्न

कृती समिती धसास लावणार महामार्गाचा प्रश्न

Next


जळगाव :  राष्ट्रीय महामार्गाची झालेली दैना, चौपदरीकरण व समांतर रस्त्यांचे भिजत घोंगडे या गंभीर प्रश्नांबाबत पाठपुरावा करून हे प्रश्न सोडविण्यासाठी अराजकीय कृती समिती स्थापन केली जाईल. ही समिती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढेल, नंतर साखळी उपोषण केले जाईल.., ही आंदोलने करीत असतानाच राज्य शासन, प्रशासन, केंद्रीय सरकारकडेही पाठपुरावा करण्याचा निर्णय शनिवारी सायंकाळी एक नागरिक मंचतर्फे आयोजित जाहीर सभेत घेण्यात आला. या सभेत खासदार, आमदार व संवेदनाहीन प्रशासनावर सडकून टीका झाली.
शहरातील जयप्रकाश नारायण चौकात ही जाहीर सभा झाली. त्यात मराठा विद्या प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.डी.डी.बच्छाव, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ.प्रताप जाधव, ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील, नगरसेवक कैलास सोनवणे, नगरसेवक अनंत जोशी, स्वाती अहिरराव, नगरसेविका अश्विनी देशमुख, अॅड.शुचिता हाडा,  जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप तिवारी, गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे, जैन स्पोर्टस् अकॅडमीचे फारूख शेख, भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे, शिवसेनेचे गजानन मालपुरे, माजी नगरसेवक मनोज चौधरी, पीयुष नरेंद्र पाटील, सरिता माळी, बंटी नेरपगार यांनी आपापली भूमिका मांडली.
मान्यवरांशिवाय व्यासपीठ
सभेसाठी व्यासपीठ उभारले होते, पण त्यावर एक नागरिक मंचशी संबंधित कुठलीही व्यक्ती बसली नाही. मान्यवर खाली बसले होते. आपली भूमिका मांडण्यासाठी ते व्यासपीठावर येत होते.
जसे मेहरूण तलावाच्या कामाला प्राधान्य दिले तसे प्राधान्य समांतर रस्त्याला  द्यावे. मनपाचे कर्मचारी भाजीबाजारातील अतिक्रमण लागलीच काढतात. याच गतीने महामार्गावरील अतिक्रमणेही काढावीत, अशीही अपेक्षा यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.   

सर्व पर्याय संपल्यावर               महामार्गावर 12 तास आंदोलन
साखळी उपोषण, मोर्चे, पदयात्रा, निवेदन देणे, पाठपुरावा हे सर्वच मार्ग अयशस्वी झाले किंवा प्रशासन, लोकप्रतिनिधी यांनी त्याची दखल घेतली नाही तर  तरूण, महिला अशा सर्वानी एकत्र येऊन महामार्ग 12 तास बंद पाडावा, अशी भूमिका मुकुंद सपकाळे, अनंत जोशी यांनी मांडली.

सर्वच क्षेत्रातील व्यक्तींनी एकत्र यावे
सभेत मान्यवरांनी आपली भूमिका मांडताना महामार्ग प्रश्नी अराजकीय मंच म्हणून कृती समिती स्थापन करण्याचा मुद्दा मांडला. त्यावर सर्वानीच सकारात्मक भूमिका घेतली. समांतर रस्ते, महामार्ग हा यक्ष प्रश्न असून, तो सोडविण्यासाठी आंदोलनांची जशी गरज आहे, तसा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालय, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, मुख्यमंत्री, जलसंपदामंत्री, महापालिका, जिल्हा प्रशासन यांच्याकडे पाठपुरावा करण्याची देखील गरज आहे. त्यासाठी मोर्चे, आंदोलने शांततामय मार्गाने करीत असतानाच लोकप्रतिनिधी, प्रशासनाकडेही तेवढय़ाच गतीने, व्यवस्थितपणे पाठपुरावा करावा लागेल. त्यासाठी शहरातील सर्वच क्षेत्रातील व्यक्तींनी एकत्र यावे, असा मुद्दाही मांडण्यात आला. त्यावर सर्वानी सहमती दिली.

अजिंठा चौक विकासाचा प्रस्ताव धूळखात-प्रा.डी.डी. बच्छाव
अजिंठा चौकातील वाहतुकीची समस्या लक्षात घेता दोन हॉटेल व आपण मिळून महापालिकेला अजिंठा चौक विकासाचा प्रस्ताव सादर केला, पण तो कुठे पडून आहे, मार्गी का लागत नाही, असा प्रश्न प्रा.डी.डी.बच्छाव यांनी उपस्थित केला.




 

Web Title: The action committee will be proud of the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.