भुसावळ येथे वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 03:52 PM2018-11-28T15:52:13+5:302018-11-28T15:59:42+5:30

भुसावळ शहरात वाहतूक नियमांची पायमल्ली करणाºया २७ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून, यातून पाच हजार ४०० रुपये दंडाची वसुली करण्यात आली आहे.

Action on the complainants of traffic rules at Bhusawal | भुसावळ येथे वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाई

भुसावळ येथे वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाई

Next
ठळक मुद्दे२७ वाहनचालकांवर कारवाईपाच हजार ४०० रुपये दंड वसूलवाहतुकीचे नियम पाळून सहकार्य करण्याची अपेक्षा

भुसावळ, जि.जळगाव : भुसावळ शहरात वाहतूक नियमांची पायमल्ली करणाºया २७ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून, यातून पाच हजार ४०० रुपये दंडाची वसुली करण्यात आली आहे.
पोलीस प्रशासनातर्फे गेल्या चार दिवसांपासून अवैध धंदे, गावठी दारूच्या भट्ट्यांवर छापे मारणे यासह वाहतूक नियमांची पायमल्ली करणाºया वाहनधारकांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.
शहरातील नाहाटा कॉलेज चौक, बस स्टॅण्ड चौक, हंबर्डीकर चौक, गांधी पुतळा, बाजारपेठ पोलीस स्टेशनसमोर, पांडुरंग टॉकीज चौक या पॉईंटवर २७ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. यात रहदारीला अडथळा निर्माण करणारे पाच, गणवेश न घालता वाहन चालविणारे, चुकीच्या दिशेने वाहन चालविणारे पाच, वाजवीपेक्षा जास्त उंचीचा माल भरून वाहन चालवणाºया तीन, सीटबेल्ट न लावून गाडी चालवणे तीन, गाडी चालवताना मोबाइलवर बोलणारे तीन जण अशा वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली.
ही कारवाई डीवायएसपी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले, वाहतूक शाखेचे इस्तियाक सैयद, श्रीकृष्ण चाटे, दिलीप पालवे, भाऊसाहेब पाटील यांनी केली.
वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळल्यास रहदारी सुरळीत होईल. वाहतुकीचे नियम तोडणाºयांंची गय केली जाणार नाही. पालकांनी लहान मुलांना वाहने देऊ नये व प्रशासनास सहकार्य करावे.
-दीपक गंधाले, सहाय्यक पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक नियंत्रण शाखा, भुसावळ

Web Title: Action on the complainants of traffic rules at Bhusawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.