‘डीसी रुल्स’वर मनपाची हरकत!
By admin | Published: January 10, 2016 12:30 AM2016-01-10T00:30:16+5:302016-01-10T00:30:16+5:30
बांधकाम विकास नियंत्रण महापालिकेसह सहा नागरिकांनी हरकती दाखल केल्याची माहिती मनपा सूत्रांनी दिली़
धुळे : राज्यातील ‘ड’ वर्ग महापालिकांसाठी समान बांधकाम विकास नियंत्रण नियमावली (डीसी रुल्स) लागू करण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर शासनाने 19 नोव्हेंबरला अधिसूचना प्रसिद्ध केली होती़ सदर नियमावलीवर महापालिकेसह सहा नागरिकांनी हरकती दाखल केल्याची माहिती मनपा सूत्रांनी दिली़ मनपातर्फे महापौर जयश्री अहिरराव यांनी हरकत दाखल केली आह़े‘एफएसआय’मध्ये वाढ करण्याची मागणी गेल्या काही वर्षापासून बांधकाम व्यावसायिकांनी शासनाकडे लावून धरली होती़ त्यानुषंगाने धुळे मनपाने यापूर्वीच ‘एफएसआय’मध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाला सादर केला होता़ अखेर शासनाने राज्यातील ड वर्ग महापालिकांसाठी ‘एफएसआय’मध्ये वाढ करीत अधिसूचना प्रसिद्ध केली़ त्यानुसार हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या़ दरम्यान मनपा महापौर जयश्री अहिरराव यांनी दाखल केलेल्या हरकतींमध्ये पाच बाबींवर आक्षेप नोंदविण्यात आला आह़े त्यात ड वर्ग प्रारूप विकास नियंत्रण नियमावलीनुसार अपेक्षित वाढीव चटई निर्देशांकानुसार महापालिकेस शीघ्रसिद्ध गणकानुसार प्रीमियम रक्कम वसूल करावयाची असून त्यातील 50 टक्के हिस्सा शासनास वर्ग करावयाचा असल्याचे नमूद आह़े तथापि महापालिकेची आर्थिक स्थिती हलाखीची असते, त्यामुळे सदर 50 टक्के हिस्सा शासनास वर्ग न करता मनपा क्षेत्रातील नागरी मूलभूत सेवा देण्यासाठी पूर्ण रक्कम मनपासाठी वापरण्याबाबत तरतूद करण्यात यावी, नागरी वस्तीतील फेरीवाल्यांसाठी मंजूर अभिन्यासातील 20 टक्के खुल्या जागेत फेरीवाल्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात बांधकाम करण्यास मुभा देण्याची तरतूद करावी, जेणेकरून फेरीवाला धोरण राबविता येईल तसेच शासनाच्या 1996 च्या परिपत्रकानुसार मंजूर अभिन्यासातील सोडावयाच्या 10 टक्के खुल्या जागेपैकी सार्वजनिक वापरासाठी बांधकाम करण्याची तरतूद मनपासाठी करण्यात यावी. या आक्षेपांचा समावेश आह़े एवढेच नव्हे तर शहराची संभाव्य हद्दवाढ लक्षात घेऊन गावठाण क्षेत्रासाठी चटई निर्देशांक वाढविण्याची तरतूद करण्याचीही मागणी नोंदविण्यात आली आह़े मोबाइल टॉवर्सवर कारवाई करण्याची तयारी एकिकडे मनपा प्रशासनाने चालविली असून दुसरीकडे महापौरांनीदेखील मोबाइल टॉवर परवानगीबाबत शासनाच्या परिपत्रकानुसार विकास नियंत्रण नियमावलीत तरतूद करण्याची मागणी नोंदविली आह़े नाशिक येथील नगररचना सहसंचालकांकडे गुरुवारी ई-मेलद्वारे हरकत दाखल करण्यात आली़ अन्य सहा नागरिकांनी दाखल केलेल्या हरकतीही सादर झाल्या आहेत़ राज्यातील ड वर्ग मनपा क्षेत्रात इमारत उभारण्यासाठी नियमानुसार एक चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) मंजूर आह़े मात्र एकीकडे लोकसंख्या वाढत असताना अपु:या एफएसआयमुळे बांधकाम व्यवसायात अडचणी निर्माण होत होत्या़ त्यामुळे