तलाव, बगीचा परिसरासह भिंतीच्या आडोशाला ‘दम मारो दम...’

By विजय.सैतवाल | Published: June 26, 2024 10:57 PM2024-06-26T22:57:38+5:302024-06-26T22:58:09+5:30

अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या सात जणांवर एलसीबीची कारवाई

action on drug places along with the lake garden area | तलाव, बगीचा परिसरासह भिंतीच्या आडोशाला ‘दम मारो दम...’

तलाव, बगीचा परिसरासह भिंतीच्या आडोशाला ‘दम मारो दम...’

विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : शहरातील वेगवेगळ्या परिसरात  सार्वजनिक ठिकाणी गांजा  सेवन करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. सात वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये सात जणांविरुद्ध जिल्हापेठ, एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सार्वजनिक ठिकाणी सर्रासपणे गांजा ओढत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने मेहरुण तलाव परिसरातील मनपाच्या जलतरण तलावच्या भिंतीच्या आडोशाला, मेहरुणच्या बगीच्याजवळील विहरीजवळ, मेहरुणच्या बगीच्यामध्ये, अजय कॉलनीतील उपकेंद्रामागे, बहिणाबाई उद्यानाच्या मागील बाजूस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर बगीचाच्या भिंतीच्या आडोशाला व  नवीन बस स्थानकाच्या मागील बाजूस गांजा ओढणाऱ्यांवर ही कारवाई केली. त्यांच्याकडून गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ नितीन बाविस्कर, हरिष परदेशी, राजेश मेढे, रवी नरवाडे यांनी केली.

याप्रकरणी शेख मशरुफ अब्दुल कादीर (४२, रा. गवळीवाडा), वसीम शेख तलत मेहमूद (३९, रा. काट्याफाईल), फय्याज शेख समशू (३६, रा. तांबापुरा) या तिघांविरुद्ध यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर किरण भगवान सकट (३१, रा. हरिविठ्ठल नगर), योगेश रमेश बाविस्कर (३४, रा. हरिविठ्ठल नगर), गणेश शालिग्राम धांडे (४१, रा. मुक्ताईनगर), अनिल रघुनाथ राणे (६२, रा. भिकमचंद नगर) या चौघांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: action on drug places along with the lake garden area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.