२ जानेवारीपासून गाळे खाली करण्याची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:14 AM2020-12-29T04:14:32+5:302020-12-29T04:14:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा परिषदेच्या मालकीच्या १८ गाळे आठवडाभरात खाली करण्याच्या प्रशासनाने नोटीसा बजावल्या असून चार दिवसानंतर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा परिषदेच्या मालकीच्या १८ गाळे आठवडाभरात खाली करण्याच्या प्रशासनाने नोटीसा बजावल्या असून चार दिवसानंतर २ जानेवारीपासून हे गाळे खाली करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांचे पोलिस प्रशासनाशीही बोलणे झाले असून पोलीस बंदोबस्त लागल्यास देण्यास पोलिस प्रशासनाने होकार दिला असल्याची माहिती आहे.
२००३ पासून करार संपूणही या गाळेधारकांनी भाडे भरले नसून गाळे खाली केलेले नाहीत. शिवाय नियमबाह्य पोटभाडेकरू ठेवल्याचे प्रशासनानचे म्हणणे आहे. सर्व कायदेशीर बाबी तपासूनच या नोटीसा बजावण्यात आल्याची व कारवाई करण्याआल्याची माहिती जि. प. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शरद येवले यांनी दिली.नियमाप्रमाणेच सर्व कारवाई करण्यात येत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी सांगितले ही वसूली कोट्यवधींची असल्याचीही माहिती आहे.