जे.के.पार्क ताब्यात घेण्याची कारवाई रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:29 AM2021-02-18T04:29:04+5:302021-02-18T04:29:04+5:30
जळगाव - शहरातील शिवाजी उद्यान भागातील जे.के. पार्कची मुदत संपून आता दीड वर्ष पूर्ण झाला आहे. मनपा प्रशासनाने दोन ...
जळगाव - शहरातील शिवाजी उद्यान भागातील जे.के. पार्कची मुदत संपून आता दीड वर्ष पूर्ण झाला आहे. मनपा प्रशासनाने दोन वेळा नोटीस
बजाविल्यानंतरही मनपाने ही जागा अद्याप ताब्यात घेतलेली नाही. मनपा प्रशासनाकडे सामाजिक कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी
वेळोवेळी निवेदन दिली आहेत. तरीही मनपाने जागा ताब्यात घेतलेली नाही.
मनपाच्या नाईट शेल्टरसाठी निविदा
जळगाव - भजे गल्लीतील मनपाच्या नाईट शेल्टरची जागा भाड्याने देण्यासाठी मनपा प्रशासनाकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत. २
मार्चपर्यंत इच्छुकांनी ऑनलाइन निविदा भरावयाच्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून नाईट शेल्टरची जागा केशवस्मृती प्रतिष्ठानने भाड्याने
घेतली होती. मुदत संपल्यामुळे मनपाने पुन्हा निविदा काढली आहे.
मनपाचे अंदाजपत्रक २५ रोजी होणार सादर
जळगाव - मनपा प्रशासनाकडून सन २०२१ ते २०२२ या आर्थिक वर्षांसाठीचे अंदाजपत्रक २५ रोजी सादर मनपा स्थायी समितीसमोर सादर
केले जाणार आहे. दरम्यान, अंदाजपत्रक सादर केल्यानंतर सकाळी ११.३० वाजता मनपा स्थायी समितीची दुसरी सभा घेतली जाणार
असून, सभेत मंजुरीसाठी ६ विषय ठेवण्यात आले आहेत.
तुटलेल्या दुभाजकाची दुरुस्ती कधी?
जळगाव - शहरातील डी-मार्ट पुढील दुभाजक गेल्या पंधरा दिवसांपासून अज्ञात वाहनाच्या धडकेने तुटला होता. मात्र, पंधरा दिवस उलटूनही मनपा प्रशासनाकडून या दुभाजकाची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. याबाबत नगरसेवक प्रशांत नाईक यांनी मनपा बांधकाम विभागाकडे तक्रार केली आहे. तसेच या दुभाजकाची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यास वेळ द्या
जळगाव - शहरातील नागरिक मनपात आपल्या समस्या घेऊन येतात. मात्र, विभागप्रमुख जागेवर नसल्याने लिपिक आपल्या पद्धतीने उत्तर देऊन परत पाठवतात. त्यामुळे नागरिकांचा ओढा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वाढत असतो. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्व अधिकारी व विभाप्रमुखांनी एक तास अर्थात दुपारी ४ ते ५ या वेळेत कार्यालयात हजर राहावे, अशा सूचना आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी सर्व विभागप्रमुखांना दिल्या आहेत.