चोपडा शहरात प्लॅस्टिक विक्रीप्रकरणी कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 09:27 PM2019-09-14T21:27:36+5:302019-09-14T21:27:40+5:30
चोपडा : शहरात पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून ११ सप्टेंबर ते १९ आॅक्टोबर या कालावधीत लोकसहभागातून स्वच्छता ही सेवा ही मोहीम ...
चोपडा : शहरात पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून ११ सप्टेंबर ते १९ आॅक्टोबर या कालावधीत लोकसहभागातून स्वच्छता ही सेवा ही मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शनिवारी प्लॅस्टिक करिबॅग तसेच अन्य बंदी असलेल्या प्लॅस्ट्क वस्तू विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
पालिका कर्मचाऱ्यांनी शहरातील हातगाड्यांचे अतिक्रमण काढून भाजीपाला विक्रेते आणि प्लास्टिकच्या वस्तू विकणाऱ्यांकडून सक्तीने प्लॅस्टिकच्या पिशव्या व इतर वस्तू जप्त केल्या. संबंधितांना कायदेशीर नोटीस देण्यात आली. शहरात विविध भागातून २० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. अनिल पाटील, मोहम्मद तरबेज खाटीक, रणछोड राम चौधरी या दुकानदारांकडून प्रत्येकी १५ हजार दंड वसूल करण्यात आला. तसेच बापू टी हाऊस व जय गुरुदेव कोल्ड्रिंक्स यांच्याकडून बंदी असलेले प्लॅस्टिक जप्त करून पंचनामा करण्यात आला.
याबाबत गुन्हे दाखल करण्याबाबत कारवाई सुरू असून यापुढे कारवाई कायम सुरू राहणार असल्याचे पालिकेचे आरोग्य अधिकारी व्ही.के. पाटील यांनी काळविले आहे.
मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांच्या मार्गदर्शनाने राजेंद्र बाविस्कर, पुरुषोत्तम सूर्यवंशी, पर्यवेक्षक प्रवीण मराठे, शुभम पाटील, सुपडू पारे, मूनसफ पठाण, दीपक घोगरे, नवल शिरसाठ, किशोर पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.