भुसावळात कारवाई सत्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:19 AM2021-05-25T04:19:17+5:302021-05-25T04:19:17+5:30

२१ रोजी पालिका प्रशासनातर्फे विनामास्क ३७ नागरिकांकडून ७ हजार १००, विनाकारण वाहन चालवणाऱ्या ४६ नागरिकांकडून ८ ...

Action session continues in Bhusawal | भुसावळात कारवाई सत्र सुरूच

भुसावळात कारवाई सत्र सुरूच

Next

२१ रोजी पालिका प्रशासनातर्फे विनामास्क ३७ नागरिकांकडून ७ हजार १००, विनाकारण वाहन चालवणाऱ्या ४६ नागरिकांकडून ८ हजार ९००, नियमाचे उल्लंघन करणाऱ्या पाच दुकानदारांकडून २२ हजार ५०० असा एकूण ३८ हजार ५०० दंड आकारण्यात आला. २२ रोजी विनामास्क ३१ नागरिकांकडून ५ हजार ९०० विनाकारण वाहनांवर फिरणाऱ्या ७३ नागरिकांकडून १४ हजार ६००,नऊ दुकानदारांकडून १५ हजार ८०० असा एकूण ३६ हजार ४००. २३ रोजी विनामास्क २६ नागरिकांकडून ४ हजार ८००, रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या ८१ गरिबांकडून १६ हजार ४००, तीन दुकानदारांवर ५ हजार, एकूण २६ हजार २०० आकारण्यात आले. २४ रोजी विनामास्क ३९ नागरिकांकडून ७ हजार ५००, रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या ६४ नागरिकांकडून ११ हजार ९००, नऊ दुकानदारांकडून १७ हजार ५०० असा एकूण ३५ हजार ९०० दंड आकारण्यात आले. २१ ते २४ 'मे'दरम्यान एकूण १ लाख ३८ हजारांचा दंड पालिका प्रशासनात वसूल करण्यात आला. कारवाई पालिका प्रशासनातर्फे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी महेंद्र कातोरे, संजय बनायते, रामदास मस्के, गोपाल पाल, किरण मनवाडे, अनिल मंदवाडे, सतीश बेदरकर, योगेश वाणी, राजेश पाटील, वैभव पवार यांनी केली. त्यांना बाजारपेठ पोलीस ठाण्याचे एपीआय धुमाळ यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Action session continues in Bhusawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.